भारत फोर्जच्या उपकंपनीकडून ‘सिंहा 4×4’चे अनावरण; आधुनिक लष्करासाठी बहुउद्देशीय चिलखती वाहन सादर

By: Editor_Manas

On: Wednesday, June 17, 2026 3:06 PM

सिंहा 4x4
Google News
Follow Us

भारत फोर्जची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (KSSL) आणि पॅरामाउंट यांनी संयुक्तपणे ‘युरोसॅटरी २०२६’ प्रदर्शनात अत्याधुनिक ‘सिंहा 4×4’ या नवीन बहुउद्देशीय चिलखती वाहनाचे अनावरण केले. आधुनिक युद्ध आणि संरक्षण दलांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले हे वाहन भारतासह आफ्रिका, दक्षिण आशिया आणि जागतिक बाजारपेठेतील सशस्त्र दलांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘सिंहा 4×4’ हे पूर्णपणे नव्याने विकसित करण्यात आलेले हलके चिलखती बहुउद्देशीय वाहन असून त्यामध्ये गतिशीलता, संरक्षण आणि विविध मोहिमांसाठी आवश्यक असलेली क्षमता एकत्रित करण्यात आली आहे. शहरी युद्ध, गुप्त माहिती संकलन, सीमासुरक्षा, विशेष मोहिमा, कमांड अँड कंट्रोल, सैनिक वाहतूक आणि सुरक्षा कार्यांसाठी हे वाहन वापरता येणार आहे.

या वाहनाची रचना मॉड्युलर स्वरूपाची असल्याने ग्राहकांच्या गरजेनुसार त्यामध्ये सहज बदल, सुधारणा आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देता येणार आहे. त्यामुळे देखभाल आणि पुरवठा व्यवस्थापन अधिक सुलभ होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले की, “सिंहा 4×4 हे भारतीय अभियांत्रिकी आणि संरक्षण तंत्रज्ञान क्षमतेचे जागतिक स्तरावरील प्रदर्शन आहे. नाटो मानकांनुसार विकसित करण्यात आलेले हे वाहन विविध देशांमध्ये स्थानिक उत्पादनासाठीही सक्षम आहे.”

पॅरामाउंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष एरिक इचिकोविट्झ यांनी सांगितले की, जगभरातील संरक्षण दलांना विविध मोहिमा पार पाडणारी, नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत आणि स्थानिक पातळीवर उत्पादन करता येणारी वाहने आवश्यक आहेत. ‘सिंहा 4×4’ ही गरज पूर्ण करण्यासाठी विकसित करण्यात आले असून संरक्षण, गतिशीलता, मॉड्युलर रचना आणि परवडणारी किंमत यांचा उत्कृष्ट संगम या वाहनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, हे वाहन भागीदार देशांमध्ये स्थानिक स्तरावर उत्पादनासाठी विकसित करण्यात आले असून त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. ‘सिंहा 4×4’ हे कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स आणि पॅरामाउंट यांच्या संयुक्त संरक्षण प्रकल्पांच्या वाढत्या पोर्टफोलिओमधील महत्त्वाचे उत्पादन मानले जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026