टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने लॉन्च केला ‘डिविडंड लीडर्स इंडेक्स पेन्शन फंड’

By: Editor_Manas

On: Thursday, May 21, 2026 7:36 PM

Google News
Follow Us

मुंबई, मे २०२६: सेवानिवृत्ती योजना म्हणजे तुम्ही काम करणे थांबवल्यानंतरही तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करत राहील याची खात्री करणे. हीच गरज पूर्ण करण्यासाठी, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने ‘टाटा एआयए डिविडंड लीडर्स इंडेक्स पेन्शन फंड’ लॉन्च केला आहे. भारतातील सर्वाधिक लाभांश देणाऱ्या मजबूत कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना प्रदीर्घ काळासाठी रिटायरमेंटचा मोठा फंड उभारता यावा, यासाठी या फंडाची खास रचना करण्यात आली आहे. हा फंड मार्केटशी जोडलेल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्यासोबतच जीवन विम्याच्या सुरक्षेचा भरवसाही देतो. अशा प्रकारे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सातत्याने प्रगती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी हा फंड एक शिस्तबद्ध मार्ग उपलब्ध करून देतो.

हा फंड भारतातील अशा ५० सर्वाधिक सातत्याने लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, ज्यांनी बाजारातील प्रत्येक चढ-उतारात आपल्या भागधारकांना फायदा मिळवून दिला आहे. हा फंड ‘पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट’ पद्धतीचा अवलंब करतो आणि IRDAI च्या नियमांनुसार ‘बीएसई 500 डिविडंड लीडर्स 50 इंडेक्स’चा मागोवा  घेतो. याचा पोर्टफोलिओ कोणत्याही एकाच ठिकाणी केंद्रित किंवा जोखमीच्या संधींऐवजी, बाजारातील प्रस्थापित आणि मजबूत कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो.

या कंपन्या लाभांश कमवून देत असल्याने, हा फंड ते पैसे तुम्हाला स्वतंत्रपणे वाटण्याऐवजी पुन्हा त्याच पोर्टफोलिओमध्ये गुंतवतो. दीर्घकाळात ही पद्धत तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरते, कारण यामध्ये तुमच्या मूळ गुंतवणुकीतील वाढ आणि पुन्हा गुंतवलेली कमाई, हे दोन्ही मिळून रिटायरमेंटसाठी एक मोठा फंड तयार करतात.

या वैशिष्ट्यामुळे ‘टाटा एआयए डिव्हिडंड लीडर्स इंडेक्स पेन्शन फंड’ हा एका पारंपारिक रिटायरमेंट गुंतवणूक पर्यायापेक्षा कितीतरी पतीने सरस ठरतो. बाजारातील चढ-उतारांना तोंड देणाऱ्या खंबीर भारतीय व्यवसायांच्या वाढीचा फायदा उठवण्यासाठी आणि दीर्घकालीन चक्रवाढीच्या ताकदीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे.

फंडाचा मुख्य तपशील

  • बेंचमार्क: बीएसई 500 डिव्हिडंड लीडर्स 50 इंडेक्स.
  • शेअर्समधील गुंतवणूक: ७०% ते १००%, जे भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोठी भागीदारी सुनिश्चित करते.
  • कॅश आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स: ०% ते ३०%, जे पोर्टफोलिओमध्ये लवचिकता राखण्यास मदत करते.

ही नवीन फंड ऑफर (NFO) २० मे २०२६ ते २७ मे २०२६ या कालावधीत खुली आहे. या कालावधीत जारी केल्या जाणाऱ्या पॉलिसींची एनएव्ही ₹१० निश्चित केली जाईल.

तुम्हाला काय मिळते

  • मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक: सातत्याने लाभांश देणाऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी.
  • विविध क्षेत्रांचा फायदा: वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवणुकीचा वैविध्यपूर्ण लाभ.
  • नियम-आधारित गुंतवणूक: नियमांवर चालणारी गुंतवणूक पद्धत, ज्यामुळे भावनांच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याचा धोका कमी होतो.
  • पुन्हा गुंतवणुकीचा लाभ: लाभांश पुन्हा गुंतवण्याचा फायदा, जो दीर्घकाळात चक्रवाढीची ताकद वाढवतो.
  • बाजारपेठेतील वाढ आणि सुरक्षा: मार्केटशी जोडलेल्या नफ्यासोबतच जीवन विम्याच्या सुरक्षेचे कवच.
  • रिटायरमेंटवर विशेष लक्ष: प्रदीर्घ काळासाठी मोठा फंड उभारण्याच्या उद्देशाने तयार केलेला, सेवानिवृत्तीला केंद्रस्थानी ठेवणारा फंड.

‘टाटा एआयए डिविडंड लीडर्स इंडेक्स पेन्शन फंड’ हा ‘टाटा एआयए स्मार्ट पेन्शन सिक्युअर’ (Tata AIA Smart Pension Secure) आणि ‘टाटा एआयए प्रीमियर पेन्शन सिक्युअर’ (Tata AIA Premier Pension Secure) याद्वारे उपलब्ध आहे. या दोन्ही पर्यायांमध्ये तुम्हाला बाजारातील चढ-उतारांशी जोडलेल्या नफ्यातून मोठा फंड उभारण्याची संधी मिळते आणि सोबतीला जीवन विम्याच्या सुरक्षेचा विश्वासही मिळतो.

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सच्या सर्व फंडांविषयी माहिती, योजनांची वैशिष्ट्ये आणि पात्रता समजून घेण्यासाठी कृपया येथे भेट द्या: www.tataaia.com

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now