राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

By: Editor_Manas

On: Tuesday, May 19, 2026 3:08 PM

Google News
Follow Us

पुणे : राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक विभाग-संबंधित संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, कार्यसंचालन नियम २६९ अंतर्गत डॉ. कुलकर्णी यांची या समितीच्या सदस्यपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती यांनी या नियुक्तीस मान्यता दिली आहे.

राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. डॉ. कुलकर्णी यांची ही नियुक्ती १८ मे २०२६ पासून प्रभावी झाली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन आणि हवामान बदलाशी संबंधित धोरणे, विधेयके व विविध विषयांचा अभ्यास करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीकडे असते. डॉ. कुलकर्णी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असून, पुण्याच्या माजी आमदार आहेत. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना याआधी संसदरत्न पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे देशातील वैज्ञानिक प्रगती, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलासंदर्भातील धोरणात्मक चर्चेत योगदान देण्याची संधी मिळणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगती, पर्यावरण संवर्धन यावर काम करण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही त्यांनी नमूद केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 1, 2026

Pratik Gangane

October 31, 2026

October 30, 2026

October 30, 2026

October 28, 2026

October 27, 2026