सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणवत्ता प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व मेरिट स्कॉलरशिप देऊन गौरव

By: Editor_Manas

On: Thursday, May 21, 2026 8:08 PM

Google News
Follow Us

पुणे, ता. २१ : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या वतीने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा तथा सचिव सौ. सुषमा एस. चोरडिया आणि सहयोगी उपाध्यक्षा सौ. स्नेहल नवलेखा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्या डॉ. किरण राव यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे कौतुक करत उत्कृष्ट निकालाबद्दल अभिनंदन केले. यंदाही महाविद्यालयाने उल्लेखनीय निकालाची परंपरा कायम राखत अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले.

विज्ञान शाखेतील तन्मय अनिकेत जहागीरदार (८९.६७ टक्के), ईशिता समीर पाटील (८८.१७ टक्के), ऋतुजा प्रताप मगर (८८ टक्के), कानन अजय मत्तानी (८७.६७ टक्के), दिव्या प्रकाश भरेकर (८६.३३ टक्के) यांचा, वाणिज्य शाखेतील वरुण हर्षद जहागीरदार (८९.६७ टक्के), दिलीप सावराम सोलंकी (८५.६७ टक्के), ऋषभ अरविंद चौहान (८४.३३ टक्के), सलोनी चेतन चौधरी (८३ टक्के), अनुश्री योगेश भानू (८२.६७ टक्के) यांचा, कला शाखेतील गौरी विवेक देशपांडे (८९.८३ टक्के), अमूल्य लक्ष्मण सोनार (८२.६७ टक्के), निशी संजय मवाडिया (८१.६७ टक्के), चैतन्य संजय चौहान (७०.६७ टक्के), गौरी प्रविण धांडे (६७.८३ टक्के) यांचा, तर व्यावसायिक अभ्यासक्रमातील (एमसीव्हीसी) यशाबद्दल एलिजा मेनेझेस (६९.६७ टक्के), ओम अमोल शिंदे आणि जय ऋषिकेश रेळेकर (६७.३३ टक्के), अजय बाळासाहेब नागरे (६४ टक्के), तसेच संग्राम गोपाळ कुटे (६०.१७ टक्के) यांचा गौरव करण्यात आला.

विज्ञान शाखेतील दिव्या प्रकाश भरेकर हिने गणित आणि सांख्यिकी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालकांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले की, ‘सूर्यदत्त’ संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. सूर्यदत्तमध्ये नेहमीच मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना विविध क्षेत्रांत यश मिळविण्यास प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, जिद्द, अभ्यासातील सातत्य, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन व साथ यामुळेच सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजने आजवर नेहमीच उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमधील शैक्षणिक वातावरण, शिक्षक-विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर दिला जाणारा विशेष भर याबद्दल पालक व विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कॉलेजमध्ये केवळ अभ्यासाचा ताण न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण संगोपनाला प्राधान्य दिले जाते, असे पालकांनी नमूद केले. पुस्तकी अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याचा कल ओळखून त्याला योग्य दिशा व प्रोत्साहन दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. तसेच कॉलेजमध्ये राबवले जाणारे सर्जनशील (creative) उपक्रम, सहशालेय (co-curricular) उपक्रम आणि विविध स्पर्धांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठा फायदा झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 9, 2026

July 6, 2026

July 6, 2026

July 6, 2026

school-holidays-1-jpg-1731597974

July 6, 2026

July 5, 2026