‘गोदरेज’कडून ‘फोर्कलिफ्ट’साठी भारतातील पहिले मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञान सादर

By: Editor_Manas

On: Thursday, May 14, 2026 3:39 PM

Google News
Follow Us

मुंबई, १४ मे २०२६ : भारतातील मटेरियल हँडलिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’ने (जीईजी) आपल्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट (एमएचई) व्यवसायाअंतर्गत ‘इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’साठी भारतातील पहिले मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञान सादर केले आहे. भारतामध्ये उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग या क्षेत्रांचा वेगाने विस्तार होत असताना अधिक कार्यक्षम, विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा उपायांची गरज वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या बॅटरीमुळे मालकीचा एकूण खर्च २५ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास, उपकरणांचा कार्यरत कालावधी वाढण्यास आणि औद्योगिक कामकाज अधिक स्वच्छ व पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे. तसेच ही बॅटरी फोर्कलिफ्टच्या संपूर्ण कार्यकालापर्यंत टिकेल, अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे.

भारतात औद्योगिक आणि वेअरहाउसिंग यांचा बाजार वेगाने वाढत आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये १.१ कोटी चौरस फुटांहून अधिक जागेचे लीजिंग झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात दुहेरी अंकातील वाढ नोंदवली गेली आहे. थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्री-पीएल), ई-कॉमर्स आणि उत्पादन या क्षेत्रांमुळे पुरवठा साखळीच्या आधुनिकीकरणाला मिळालेली चालना हे यामागचे प्रमुख कारण आहे. गोदामांची संख्या आणि त्यांच्या कामकाजाचा वेग वाढत असताना, ऊर्जा कार्यक्षम, सुरक्षित आणि भविष्यासाठी तयार असलेल्या मटेरियल हँडलिंग उपायांची गरज आता उत्पादकता आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे.

‘मल्टी आयन बॅटरी’मध्ये जलद आणि ऑपर्च्युनिटी (कामाच्या मधल्या वेळेत) चार्जिंग, शून्य देखभाल खर्च आणि ऊर्जेची उच्च कार्यक्षमता यांसारख्या सुविधा एकत्रितपणे देण्यात आल्या आहेत. तसेच, यामध्ये दुर्मिळ धातूंवरील अवलंबित्व कमी करण्यात आले असून बॅटरीच्या विल्हेवाटीशी संबंधित अडचणीही कमी होतील, याची काळजी घेण्यात आली आहे. भारतामधील आघाडीच्या ‘डीप-टेक बॅटरी इनोव्हेटर्स’पैकी एका कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान तब्बल ५,००० लाईफ सायकल्स देते. हे प्रमाण सामान्य लिथियम-आयन बॅटरींपेक्षा जवळपास ६० टक्के अधिक आहे. त्यामुळे उपकरणाच्या संपूर्ण कार्यकाळासाठी हीच बॅटरी वापरता येते आणि खर्चही कमी होतो. ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तपमानातही विश्वासार्हरीत्या कार्य करण्यासाठी ही मल्टी आयन बॅटरी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील उष्णकटिबंधीय हवामानासाठी ती विशेष उपयुक्त ठरते.

‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट विभागाचे बिझनेस हेड अनिल लिंगायत म्हणाले, “भारतामधील पुरवठा साखळी अधिक व्यापक आणि गुंतागुंतीची होत आहे. अशा वेळी मटेरियल हँडलिंग क्षेत्राला विश्वासार्ह, दीर्घकालीन मूल्य देणारे आणि शाश्वत ऊर्जेचे उपाय आवश्यक आहेत. मल्टी आयन बॅटरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही औद्योगिक उपकरणांना ऊर्जा देण्याची पद्धत अधिक आधुनिक आणि कार्यक्षम बनवत आहोत. प्रगत अभियांत्रिकीच्या मदतीने उपकरणे अधिक काळ कार्यरत राहणे, मालकीचा खर्च कमी होणे आणि एमएसएमईंसह संपूर्ण मूल्यसाखळीत अधिक स्वच्छ कामकाज करणे यांवर आमचा भर आहे. डिझाइन-आधारित नवकल्पना, संशोधन व विकास आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवून आणण्याच्या आमच्या प्रयत्नांचे हे उदाहरण आहे.”

मटेरियल हँडलिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या मते, अशा नव्या तंत्रज्ञानामुळे पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम, वेअरहाउसिंग अधिक उत्पादक आणि औद्योगिक कामकाज अधिक स्थिर बनण्यास मदत होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 14, 2026

May 14, 2026

May 14, 2026

May 14, 2026

May 14, 2026

May 14, 2026