नवोन्मेषाचा गौरव: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त एचडीएफसी स्कायने भारताच्या एफअँडओ मार्केटच्या वाढीबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला

By: Editor_Manas

On: Friday, May 15, 2026 7:20 AM

Google News
Follow Us

मुंबई, 15 मे 2026: एचडीएफसी सिक्युरिटीजच्या एचडीएफसी स्काय या डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्मने, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या निमित्ताने, भारताच्या F&O (फ्युचर्स आणि ऑप्शन्स) क्षेत्राचे स्वरूप तंत्रज्ञान कशा प्रकारे बदलत आहे आणि टियर 3 व टियर 4 श्रेणीतील बाजारपेठांमधून मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवत आहे, यावर प्रकाश टाकला.

अलीकडील काही वर्षात, लहान शहरे आणि गावातून गुंतवणूकदारांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढला आहे. 2019 मध्ये, नवीन डीमॅट खात्यांमध्ये नॉन मेट्रो भागांचा केवळ 25% वाटा होता; मात्र आता हा आकडा 60% च्याही पुढे गेला आहे. आर्थिक वर्ष 2020 ते 2025 या कालावधीत, B30 शहरांचा (शहरी केंद्रांच्या बाहेरील प्रमुख 30 शहरे) नवीन एसआयपी खात्यांमध्ये 58% वाटा राहिला आहे; तसेच म्युच्युअल फंडांची मालमत्ता दरवर्षी 21% पेक्षा अधिक दराने वाढत जाऊन, सप्टेंबर 2025पर्यंत ती 14.5 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. मासिक SIP योगदान विक्रमी अशा 29,361 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले असून, सर्व नवीन गुंतवणूकदार खात्यांपैकी निम्म्याहून अधिक खाती आता लहान शहरांमधील आहेत.

2026च्या सुरुवातीपर्यंत, एकूण डीमॅट खात्यांची संख्या अंदाजे 22.5 कोटींवर पोहोचली होती; यामध्ये नव्याने जोडल्या गेलेल्या खात्यांपैकी जवळपास 50% खाती टियर 2 आणि टियर 3 श्रेणीतील शहरांमधून आली होती. त्याचप्रमाणे, 3.5 कोटींहून अधिक म्युच्युअल फंड गुंतवणूकदार हे टियर 3 आणि टियर 4 श्रेणीतील शहरांमधील आहेत. मथुरा, झाशी, रुरकी, बिकानेर, कटक, मेरठ, विजयवाडा आणि भटिंडा यांसारख्या उदयोन्मुख शहरांमधील गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे; वाढती जागरूकता, डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि पारंपरिक मालमत्ता प्रकारांपासून दूर जाण्याचा कल यामुळे  हे बदल घडून येत आहेत.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, कंपनीला तिच्या एचडीएफसी स्काय या डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्मद्वारे डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. एचडीएफसी स्काय एफ अँड ओ डॅशबोर्ड, जो रिअल-टाइम ॲनालिटिक्स, कृती करण्यायोग्य दृष्टिकोन आणि सहज वापरता येणारी साधने देतो, त्याने सक्रिय ट्रेडर्समध्ये 95% पेक्षा जास्त मान्यता मिळवली आहे. हा प्लॅटफॉर्म प्रामुख्याने तरुण, तंत्रज्ञानात प्रगत आणि विश्लेषणात्मक वापरकर्ता वर्गाला सेवा देतो, ज्यापैकी 66% ग्राहक हे 26-45 वयोगटातील आहेत. महिलांचा सहभाग 18.5% आहे, जो डिजिटलदृष्ट्या सक्रिय गुंतवणूकदारांमधील वाढते वैविध्य दर्शवतो.

एचडीएफसी स्काय एफऍंडओ डॅशबोर्डचा विचार करता, भौगोलिकदृष्ट्या पाहता, 60 टक्क्यांहून अधिक वापरकर्ते महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यांसारख्या राज्यांमधून येतात. यामध्ये टियर 1 शहरांचा वाटा 16 टक्के, टियर 2 शहरांचा वाटा 23.5 टक्के आहे; तर टियर 3 आणि टियर 4 शहरांचा वाटा 60.5 टक्के असून, यावर या शहरांचेच वर्चस्व दिसून येते. या आकडेवारीवरून, महानगरांच्या पलीकडेही या प्लॅटफॉर्मचा किती खोलवर विस्तार झाला आहे, हे अधोरेखित होते. रंगारेड्डी, भावनगर, गुंटूर, खेडा, कोल्हापूर, अमृतसर, रायचूर, देहरादून, भरूच, वाराणसी, भिलवाडा, जालंधर आणि इतर अशा बाजारपेठांमध्ये, अलीकडील काही वर्षांत एफअँडओ विभागात लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

अखंड डिजिटल ऑनबोर्डिंग, बहुभाषिक इंटरफेस आणि डेटा-आधारित अंतर्दृष्टी यांच्या माध्यमातून एचडीएफसी स्काय हे परिवर्तन घडवून आणणे सातत्याने सुरू ठेवते; ज्यामुळे आधुनिक काळातील ग्राहकांसाठी गुंतवणूक करणे अधिक सुलभ होते. याच्या तंत्रज्ञान-आधारित परिसंस्थेमध्ये AI-शक्तीवर आधारित शिफारसी, पोर्टफोलिओचे रिअल-टाइम ट्रॅकिंग, प्रगत चार्टिंग साधने, स्मार्ट अलर्ट्स, ध्येय-आधारित गुंतवणुकीची वैशिष्ट्ये आणि एकात्मिक संशोधन अहवाल यांचा समावेश आहे; ज्यामुळे गुंतवणूक प्रक्रिया अधिक सुलभ आणि सहजसाध्य बनते.

“संपत्ती निर्मितीच्या संधींची व्याप्ती तंत्रज्ञानाने मूलभूतपणे वाढवली आहे. आजचे गुंतवणूकदार कुठेही असले तरी, सुलभता, वेग आणि वैयक्तिकृत माहितीची अपेक्षा करतात. एआय-चलित सल्लागार सेवा, व्हॉइस-इनेबल्ड इन्व्हेस्टिंग आणि जलद सेटलमेंट सायकल यासारखे नवोपक्रम टियर 3 आणि टियर 4 मार्केटमधील सहभागाला अधिक प्रोत्साहन देतील. भविष्यात पोर्टफोलिओ ॲनालायझर, क्वांट रिसर्च, SKAI द एआय पावर्ड ट्रेडिंग असिस्टंट, अल्गोरिदमिक ट्रेडिंग आणि अशा अनेक नवीन सेवा सादर करून संस्था आपल्या वाढीला गती देण्याची योजना आखत आहे. या प्रत्येक सेवेमागे संपूर्णपणे तांत्रिक प्रगती आणि एआयचा वापर असेल,” असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ धीरज रेली म्हणाले.

एचडीएफसी स्काय गुंतवणुकीची आणि ट्रेडिंगची विविध साधने उपलब्ध करून देते—ज्यामध्ये स्काय सिग्नल्स, मार्जिन प्लेज आणि मार्जिन ट्रेडिंग सुविधा, स्टॉक एसआयपी, तसेच ईटीएफ आणि गोल्ड ईटीएफ मधील गुंतवणुकीचा समावेश आहे. यासोबतच, वापरकर्त्यांच्या बाह्य पोर्टफोलिओचा आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा एकत्रित आढावा घेण्याची सुविधाही हे व्यासपीठ पुरवते; ज्यामुळे पुढच्या पिढीचे, तंत्रज्ञान-आधारित गुंतवणूक व्यासपीठ’ म्हणून एचडीएफसी स्कायचे स्थान अधिकच बळकट होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now