मुंबई, भारत, 15 मे, 2026 – इंदुलेखा भृंग हेअर ग्रोथ सीरमवरील आपला दुसरा मोठा क्लिनिकल अभ्यास यशस्वीरित्या पूर्ण केल्याची घोषणा इंदुलेखाने केली आहे, ज्यामुळे भारतातील वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केस ग्रोथ सीरम म्हणून तिचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.
2024 मधील अभ्यासानंतर 2025 मध्ये आयोजित केलेल्या नवीन चाचण्यांचे प्रमुख निष्कर्ष:
- 90 दिवसांत उगवले 11,000 नवीन केस; कठोर वैज्ञानिक अभ्यासाद्वारे हे प्रमाणित केले गेले.
- 3% रेडेंसिल असलेल्या सीरमपेक्षा केस दुपटीने जास्त वाढतात
- ॲनाजेन-टू-टेलोजेन (A:T) गुणोत्तरामध्ये 74% सुधारणा, निरोगी केसांच्या वाढीचे चक्र पुनर्संचयित करण्याची उत्पादनाची क्षमता सिद्ध करते.
हा अभ्यास त्वचाशास्त्रज्ञ आणि आयुर्वेदिक चिकित्सकांच्या देखरेखीखाली नोंदणीकृत क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनद्वारे केला गेला.
प्रामाणिक आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आणि कठोर क्लिनिकल प्रमाणीकरण एकत्र करण्यावर नेहमीच आमचा भर राहिला आहे. दोन वर्षांमध्ये दोन स्वतंत्र क्लिनिकल चाचण्या करून, ग्राहकांना उत्पादनाच्या परिणामकारकतेबद्दल आणि प्रत्यक्षात लक्षात येण्याजोगे परिणाम देण्याच्या क्षमतेबद्दल पूर्ण पारदर्शकता तसेच आत्मविश्वास देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” युनिलिव्हरचे हेअरकेअरचे व्हीपी साईराम सुब्रमण्यन म्हणाले.
फॉलिक्युलर स्तरावर परिणाम दाखवून फॉर्म्युलेशन केसांच्या नैसर्गिक वाढीच्या चक्राला समर्थन देते, हे या निष्कर्षातून समोर येते. सीरम केस दाट बनवते आणि केसांना चांगली वाढ देते, याच्याशी 97% लोक सहमत आहेत.
केस वाढण्याचे आश्वासन देणारी उत्पादने, विशेषत: स्कॅल्प सीरम श्रेणी सारखे 3% रेडेंसिल-आधारित फॉर्म्युलेशन ऑफर करणाऱ्या अनेक ब्रँड्सनी गोंधळ वाढवला आहे. आम्ही ग्राहकांच्या हितासाठी प्रयत्नशील असल्याने आमच्यासाठी इंदुलेखा हेअर ग्रोथ सीरमच्या तुलनात्मक क्लिनिकल अभ्यासाद्वारे 3% रेडन्सिलच्या परिणामकारकतेचे कठोरपणे मूल्यांकन करणे आवश्यक होते, ज्यामुळे कामगिरीचे अधिक मजबूत, विश्वासार्ह आणि विज्ञान-समर्थित मूल्यांकन सुनिश्चित होते.
2024 आणि 2025 दरम्यान 20 ते 45 वर्षे वयोगटातील सहभागींवर अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही केस लवकर दाट होण्याचा अनुभव आला. या चाचण्यांमध्ये केसांची वाढ आणि टाळूच्या आरोग्याशी संबंधित अनेक मापदंडांचे मूल्यमापन केले गेले, ज्यात नवीन केसांची वाढ, केस गळणे, फॉलिकलची ताकद आणि टाळूचे काम यांचा समावेश आहे.
या अभ्यासातील सहभागींनी काही दृश्यमान परिणामही नोंदवले:
- 100% सहभागींना केस अधिक दाट झाल्याचे दिसून आले.
- 97% सहभागींनी केस गळण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे नमूद केले.
- 97% सहभागींना केसांच्या घनतेमध्ये सुधारणा झाल्याचा अनुभव आला.
2024 मधील वैद्यकीय चाचणीचे निष्कर्ष यापूर्वीच प्रकाशित करण्यात आले आहेत, तर 2025 मधील चाचणीचे निकाल ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च इन डर्मेटोलॉजी’मध्ये सादर करण्यात आले आहेत.
पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक त्वचाविज्ञान यांच्यात समन्वय साधण्याच्या व्यापक प्रयत्नांचे प्रतिबिंब म्हणजे इंदुलेखाचे प्रयत्न. सर्व वैद्यकीय अभ्यास हे प्रत्यक्ष केस गळतीची समस्या असलेल्या भारतीय सहभागींवरच केले जातात; यामुळे समोर येणारे निष्कर्ष हे भारतीय टाळूची वैशिष्ट्ये आणि केसांच्या घनतेचे नमुने यांच्याशी सुसंगत तसेच समर्पक ठरतात. आपल्या उत्पादनांसाठी अनेक वैद्यकीय चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतरही, इंदुलेखा आयुर्वेदिक औषधीय सूत्रांच्या वैज्ञानिक प्रमाणीकरणासाठी सातत्याने गुंतवणूक करते आहे.





