दांडगे कुटुंबावर काळाचा घाला; जिन्यात दबा धरुन बसला होता मृत्यूचा सापळा

By: Editor_Pratik

On: Tuesday, April 14, 2026 8:54 AM

Google News
Follow Us

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कुंभेफळ परिसरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री घराच्या जिन्यात खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. मुलाच्या जाण्याने दांडगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शंभू ज्ञानेश्वर दांडगे असे या मृत बालकाचे नाव आहे.

उजव्या पायाला नागाचा दंश

दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शंभू हा रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या जिन्यावर खेळण्यात दंग होता. मात्र, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या एका विषारी नागाने शंभूच्या उजव्या पायाला दंश केला. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून आईने तातडीने तिथे धाव घेतली, तेव्हा मुलाच्या पायातून रक्त येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही वेळातच शंभूची प्रकृती बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला तात्काळ करमाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर शहरातील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, नशिबाचा खेळ असा की, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. शंभू हा आपल्या आई-वडिलांचे पहिले अपत्य होता, त्याच्या अशा जाण्याने संपूर्ण कुंभेफळ गावावर शोककळा पसरली आहे.

उन्हामुळे सापांचा वावर वाढल्याचा अंदाज

उन्हाचा कडाका वाढल्याने सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026