अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

By: Editor_Pratik

On: Wednesday, April 15, 2026 10:16 AM

Google News
Follow Us

अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. काळेवाडी येथे सोमवार (दि.१३) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय भोसले (४७, रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुरडीला आंबा देण्याचे आमिष दाखवून तिला जवळच्या खोलीत नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही वेळाने चिमुरडी अस्वस्थ दिसून आल्याने तिच्या आईला संशय आला. चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेनंतर चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पीडित चिमुरडीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. काळेवाडी पोलिस तपास करत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now