महाराष्ट्रात नक्की चाललंय काय? मंत्री नरहरी झिरवाळांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर : शासकीय निवासस्थानात ट्रांसजेंडर व्यक्तीसोबत कॅमेऱ्यात कैद झाल्याने खळबळ; राजकीय वर्तुळात गोंधळ

By: Editor_Pratik

On: Wednesday, March 25, 2026 5:20 PM

Google News
Follow Us

राज्यातील राजकीय वर्तुळात एका कथित व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत असलेला एक आक्षेपार्ह व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, या प्रकरणावर विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित व्यक्ती पवन यादव असल्याचे सांगितले जात असून, हा व्हिडिओ त्याच्या नातेवाईकांनी सार्वजनिक केल्याची चर्चा आहे. मात्र, या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय निवासस्थानाच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शासकीय सुविधांचा गैरवापर झाल्याचे आरोप काही स्तरांतून व्यक्त होत आहेत, तर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.

या संदर्भात पवन यादव याच्यावर यापूर्वी मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात दमदाटी व खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर येत आहे. तसेच या प्रकरणात इतर काही नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या कथित व्हिडिओबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करत नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026