जनता हॉस्पिटलमध्ये ‘एनसीओ’ कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

By: Editor_Pratik

On: Wednesday, March 18, 2026 9:16 PM

Google News
Follow Us

पुणे : पर्वती येथील जनतावसाहतमध्ये असणाऱ्या जनता दवाखान्यामध्ये ‘एनसीओ’ कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

ज्या तपासण्या सर्वसामान्यंना करणे परवडत नाही अशा तपासण्या ’एनसीओ’ कॅम्पअंतर्गत करण्यात आल्या. यात प्रामुख्याने थुंकी तपसणी, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉईड तसेच कॅन्सरच्या ओरल टेस्ट यांचा समावेश आहे.
या तपासण्या सर्वांसाठी मोफत असल्या तरी यामध्ये महिलांचा उर्त्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात गरोदर महिलांच्याही अत्यावश्यक तपासण्या करण्यात आल्या.

अशा प्रकारचे शिबिरे कायम भरवले जातात त्यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य जपले जाते. रिपोर्टमध्ये त्रुटी जाणवल्यास औषध गोळ्यांनी बरे केले जाते असे वैद्यकीय अधिकारी तहुरा शेख यांनी सांगितले.

हे शिबिर डॉ. तहुरा शेख, वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले होते. हे शिबिर यशस्वीरित्या पार पडावे यासाठी सुप्रिया ओव्हळ, छाया तोटरे, छाया कुंभार, निखिल गायकवाड, रोहित अभंग, सचिन साळुंके याचप्रमाणे सर्व ‘आशा’ताई यांचे सहकार्य लाभले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now