Nagpur Blast : एकामागून एक भीषण स्फोट; धुराच्या लोटांखाली आईची मुलीच्या प्रतिक्षेत कासावीस अवस्था

By: Editor_Pratik

On: Sunday, March 1, 2026 9:40 AM

Google News
Follow Us

Nagpur Blast : एकामागून एक भीषण स्फोट; धुराच्या लोटांखाली आईची मुलीच्या प्रतिक्षेत कासावीस अवस्था

नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील राहुळगाव परिसरातील SBL Energy Limited या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवारी (१ मार्च) सकाळी भीषण स्फोटांची मालिका झाली. सकाळी सुमारे ७.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

सकाळची शिफ्ट नेहमीप्रमाणे सुरू असतानाच अचानक काळाकुट्ट धूर आकाशात झेपावला आणि पाठोपाठ प्रचंड आवाजाचे स्फोट होऊ लागले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जवळपास एक ते दीड तास अधूनमधून स्फोट होत राहिले. डेटोनेटर पॅकिंग युनिटमधून सुरू झालेल्या या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरला.

या प्लांटमध्ये काम करणाऱ्या कांता चचाने यांच्यासाठी हा दिवस आयुष्यभर विसरता न येणारा ठरला. स्फोट सुरू झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कामगारांना बाहेर काढण्यात आले. जीव वाचवण्यासाठी सर्वजण गेटकडे धावत होते. मात्र, कांताबाईंचे पाय थबकले होते, कारण ज्या युनिटमध्ये स्फोट सुरू होते, त्याच ठिकाणी त्यांची २६ वर्षांची मुलगी मंगेश्री रवींद्र येसकर काम करत होती.

स्फोट थांबल्यानंतर जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. रुग्णवाहिकांचे सायरन, लोकांचा आक्रोश आणि धुराचे लोट यामध्ये कांताबाई प्रत्येक बाहेर येणाऱ्या जखमीमध्ये आपल्या लेकीचा चेहरा शोधत होत्या. “माझी मुलगी बाहेर येईल ना?” या एका प्रश्नाने त्यांचे डोळे प्लांटकडे खिळले होते.

घटनेनंतर प्रशासन व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. मात्र, अनेक कुटुंबांसाठी ही दुर्घटना आयुष्यभराची जखम ठरली आहे. नागपूर जिल्ह्यातील या घटनेने औद्योगिक सुरक्षेच्या प्रश्नाला पुन्हा एकदा अधोरेखित केले असून, अनेक कुटुंबांच्या स्वप्नांचा राख झालेला अवशेष मागे ठेवला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026