मोठी बातमी : जुन्या वाहनधारकांना झटका; पर्यावरण कर दुप्पट, विधेयकाला मंजुरी

By: Editor_Pratik

On: Wednesday, March 18, 2026 4:55 PM

Google News
Follow Us

मोठी बातमी  मुंबई : महाराष्ट्रातील जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनधारकांसाठी मोठा आर्थिक झटका ठरणारा निर्णय आज विधिमंडळात घेण्यात आला. महाराष्ट्र मोटर वाहन कर (सुधारणा) विधेयक, 2026 एकमताने मंजूर करण्यात आले असून, पर्यावरण करात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधेयक मांडताना सांगितले की, वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, पर्यावरण संरक्षणाला चालना देणे आणि परिवहन व्यवस्थेत सुधारणा करणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन कररचनेनुसार,

दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर 2000 रुपयांवरून 4000 रुपये,

पेट्रोल वाहनांसाठी 3000 रुपयांवरून 6000 रुपये,

डिझेल वाहनांसाठी 3500 रुपयांवरून 7000 रुपये करण्यात आला आहे.

हा कर दर पाच वर्षांसाठी एकरकमी भरावा लागणार आहे.

या निर्णयामुळे राज्य सरकारला दरवर्षी सुमारे 160 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. हा निधी रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, एटीएस प्रणाली बळकट करणे आणि प्रशिक्षण यासाठी वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, औद्योगिक क्षेत्राला दिलासा देत क्रेन वाहनांवरील मोटार करासाठी 30 लाख रुपयांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या विधेयकामुळे बीएस-6 आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळणार असून, पर्यावरणपूरक वाहतूक प्रणालीकडे राज्याची वाटचाल अधिक वेगाने होईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सभागृहातील सर्व पक्षांनी या विधेयकाला एकमताने मंजुरी दिल्याने राज्याच्या शाश्वत विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 18, 2026

March 18, 2026

March 18, 2026

March 17, 2026

March 17, 2026

March 17, 2026