व्यावसाईकांना विनाकारण वेठीस धरू नका – मा. उपसरपंच संदिप मते; खडकवासला धरण चौपटीवरील खांब बसवणीमुळे हातगाडी व्यावसायिकांची पिळवणूक

By: Editor_Pratik

On: Saturday, December 27, 2025 3:09 PM

Google News
Follow Us

विशाल भालेराव

खडकवासला – खडकवासला धरणाच्या धरण चौपटीकडे जाणाऱ्या कडेणे रोडवर राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (NHAI/सार्वजनिक बांधकाम विभाग) रस्त्याच्या कडेला खांब बसवण्यात आले आहेत. मात्र, या खांबांचा अंतर (डिस्टन्स) आणि प्रत्यक्ष रस्त्याची रुंदी यामध्ये मोठी तफावत आढळून येत असून, त्यामुळे परिसरातील हातगाडी व छोटे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

या खांब बसवणीमुळे रस्त्याची उपयोगी जागा कमी झाली असून हातगाडी, फेरीवाले तसेच लहान व्यावसायिकांना आपला व्यवसाय करणे कठीण बनले आहे. यामुळे प्रशासनाकडून यावसाईकांना विनाकारण वेटीस धरले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.

यासंदर्भात माजी सरपंच संदिप मते यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की,

“रस्त्याच्या मोजमापानुसार खांब बसवलेले नसून, चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे हातगाडीवाल्यांची पिळवणूक होत आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन सुधारणा करावी. अन्यथा स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होईल.”

धरण परिसर हा पर्यटनदृष्ट्या तसेच स्थानिक रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अशा ठिकाणी कोणतीही विकासकामे करताना स्थानिक यावसाईकांचा विचार होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून खांबांचा योग्य डिस्टन्स निश्चित करावा व हातगाडी तसेच छोटे व्यावसायिक यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशाराही स्थानिकांकडून दिला जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026