पुणे महापालिका निवडणूक २०२५-२६ : चार दिवसांत ९,१०१ नामनिर्देशन फॉर्मची विक्री; नगर रोड–वडगाव शेरी कार्यालय आघाडीवर

By: Editor_Pratik

On: Saturday, December 27, 2025 1:49 PM

PMC BIG NEWS
Google News
Follow Us

पुणे : मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून, शहरातील ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवकांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.

निवडणूक प्रक्रियेअंतर्गत दि. २३ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ९,१०१ नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आली आहे. यामध्ये दि. २७ डिसेंबर रोजी एकाच दिवशी १,२०६ नामनिर्देशन फॉर्मची विक्री झाल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.

आजच्या दिवशी सर्वाधिक नामनिर्देशन फॉर्म विक्री नगर रोड–वडगाव शेरी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात (१३१) झाली. तर सर्वात कमी विक्री कोथरूड–बावधन आणि औंध–बाणेर कार्यालयांत (प्रत्येकी ४५) नोंदविण्यात आली.

दि. २७ डिसेंबर रोजी विविध निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधील नामनिर्देशन फॉर्म विक्रीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
येरवडा–कळस–धानोरी (४६), नगर रोड–वडगाव शेरी (१३१), कोथरूड–बावधन (४५), औंध–बाणेर (४५), शिवाजीनगर–घोले रोड (९१), कै. बा. स. ढोले पाटील रोड (६४), हडपसर–मुंढवा (७५), वानवडी–रामटेकडी (८१), बिबवेवाडी (७६), भवानी पेठ (८५), कसबा–विश्रामबाग वाडा (५३), वारजे–कर्वेनगर (१२६), सिंहगड रोड (९६), धनकवडी–सहकारनगर (११८) आणि कोंढवा–येवलेवाडी (७४).

दरम्यान, आजपर्यंत एकूण ३८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून, त्यासंदर्भातील नमुना–२ (प्राप्त नामनिर्देशन पत्राची सूचना) निवडणूक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अनुषंगाने शहरात आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी विविध आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे उप आयुक्त, निवडणूक कार्यालय, पुणे महानगरपालिका यांनी स्पष्ट केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026