पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६; ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) प्रथमच ऑनलाईन यंत्रणा लागू

By: Editor_Pratik

On: Saturday, December 27, 2025 3:11 PM

Google News
Follow Us

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ साठी प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२५ असून, अर्जासोबत आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी महापालिकेने प्रथमच ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली आहे.

मागील निवडणुकांमध्ये NOC देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत होते तसेच विलंब होत असल्याने अनेक उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही प्रक्रिया सुलभ व जलद व्हावी, यासाठी यंदाच्या निवडणुकीत https://nocelection.pmc.gov.in ही स्वतंत्र ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ऑनलाईन प्रणालीद्वारे महापालिकेच्या एकूण ४१ खात्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर जोडण्यात आले असून, उमेदवाराचा अर्ज एकावेळी सर्व संबंधित खात्यांकडे NOC साठी पाठवला जाणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे.

महत्वाचे म्हणजे, ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत NOC साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २९ डिसेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची प्राधान्याने पूर्तता करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे. मात्र, ३० डिसेंबर २०२५ रोजी सादर होणारे अर्ज विलंबाने प्राप्त झाल्याने, संबंधित खात्यांकडून वेळेत NOC न मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदारांची राहील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

या नव्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे निवडणूक प्रक्रियेत गती येणार असून, उमेदवारांचा वेळ आणि कागदपत्रांची धावपळ लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026