BIG NEWS : नवले पुलावरील अपघातांच्या मालिकेला अखेर पूर्णविराम; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी

दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय । प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या पुढाकाराने बैठकीचे नियोजन.

रूपाली चाकणकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश । भूपेंद्र मोरे यांची माहिती

दिल्ली | नवले पूल व परिसरात सातत्याने घडणाऱ्या भीषण अपघातांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात होते. या गंभीर व अत्यंत संवेदनशील प्रश्नावर अखेर निर्णायक तोडगा निघाला असून, आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठकीत नवले पुलावर तातडीने एलिव्हेटेड ब्रिज उभारण्यास मंजुरी देण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवले पुलावरील अपघातांची मालिका, वाहतूक कोंडी, नागरिकांचे होणारे बळी आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न सविस्तरपणे मांडण्यात आला.

या संपूर्ण विषयासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रूपाली चाकणकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आजच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

या बैठकीत एलिव्हेटेड ब्रिजची मागणी आग्रहीपणे मांडण्यात आली. यावर मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांनी तत्काळ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला तातडीची मंजुरी दिली. तसेच सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेशही देण्यात आले.
संबंधित विषयाची गांभीर्यता लक्षात घेऊन जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना गांभीर्यपुर्वक लक्ष देऊन लवकर कार्यवाही करण्याबाबत श्री .नितीनजी गडकरी यांनी सुनावले व त्यानुसार आजच तातडीची बैठक घेऊन त्वरित प्रस्ताव सादर करावा यासाठी त्यांनी निर्वाणीची सूचना दिली..

सामाजिक कार्यकर्ते श्री. भूपेंद्र मोरे यांनी या विषयासाठी सातत्याने आंदोलने, निवेदने व प्रशासनाशी संघर्ष करत हा प्रश्न केंद्र सरकारपर्यंत पोहोचवला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला, आहे..जनतेसाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या भूपेंद्र मोरे यांना या त्यांनी केलेल्या विविध आंदोलनाचे यश मिळाले आहे.

बैठकीत सर्व प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून एलिव्हेटेड ब्रिजच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मा. श्री. नितीनजी गडकरी यांनी दिले. त्यामुळे नऱ्हे, वडगाव बुद्रुक, आंबेगाव, वारजे तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या बैठकीस मा. श्री. सुनीलजी तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रूपाली चाकणकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. भूपेंद्र मोरे, श्री .निलेश चाकणकर,तसेच श्री. सोमनाथ शेडगे उपस्थित होते.

या संवेदनशील प्रश्नावर तातडीने निर्णय घेतल्याबद्दल श्री. भूपेंद्र मोरे यांनी मा. श्री. नितीनजी गडकरी, मा. श्री. सुनीलजी तटकरे आणि मा. रूपाली चाकणकर यांचे जाहीर आभार मानले. जनतेसाठी काहीतरी करू शकलो याचे निश्चित समाधान आहे..ह्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत मी याचा पाठपुरावा करणार असल्याचे श्री .भूपेंद्र मोरे यांनी सांगितले.