मोटोहाऊसचा पुण्यात विस्तार – स्वारगेट येथे नवीन डीलरशिप, बुकिंग व डिलिव्हरीला सुरुवात

By: Editor_Pratik

On: Friday, December 26, 2025 1:02 PM

Google News
Follow Us

मोटोहाऊसचा पुण्यात विस्तार – स्वारगेट येथे नवीन डीलरशिप, बुकिंग व डिलिव्हरीला सुरुवात

ऑस्ट्रियाच्या ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीच्या व्हीएलएफ स्कूटर्स आता पुणेकरांसाठी उपलब्ध

पुणे : केएडब्ल्यू व्हेलोस मोटर्स प्रा. लि. (KVMPL) अंतर्गत कार्यरत असलेल्या मोटोहाऊसने कृष्णा मोटो यांच्या सहकार्याने पुण्यातील स्वारगेट येथे आपली नवीन प्रीमियम डीलरशिप सुरू केली आहे. या डीलरशिपमुळे पुणेकरांना जागतिक दर्जाच्या मोटरसायकल्स, पेट्रोल स्कूटर आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन्स एका छताखाली उपलब्ध होणार आहेत.

या डीलरशिपमधून ऑस्ट्रियाच्या ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीच्या व्हीएलएफ (VLF) टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर तसेच मॉबस्टर 135 पेट्रोल स्कूटरची अधिकृत बुकिंग व डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे.

जागतिक दर्जाचे टू-व्हीलर ब्रँड पुण्यात

ब्रिक्स्टन मोटरसायकल्सच्या श्रेणीत क्रॉसफायर 500एक्स, क्रॉसफायर 500एक्ससी, क्रॉमवेल 1200, क्रॉमवेल 1200एक्स आणि आगामी स्टॉर 500 या मॉडेल्सचा समावेश आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्स, दमदार इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक रेट्रो-डिझाइन यांचे हे प्रभावी संयोजन आहे.

शहरी प्रवासासाठी उपयुक्त असलेल्या व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर आणि मॉबस्टर 135 पेट्रोल स्कूटरमध्ये हलकी बॉडी, मोबाईल चार्जिंग सुविधा, मोठे टायर्स, काढता येणारी बॅटरी, कॅन्टिलिव्हर सस्पेन्शन, तीन रायडिंग मोड्स आणि सुमारे 150 किमीपर्यंतची रेंज अशी वैशिष्ट्ये आहेत.

मोटोहाऊसचा दृष्टिकोन

केव्हीएमपीएल – मोटोहाऊसचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. तुषार शेळके म्हणाले,
“हा विस्तार म्हणजे केवळ डीलरशिप सुरू करणे नाही, तर भारतीय रायडर्ससाठी जागतिक दर्जाचा अनुभव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंपरा, आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक मोबिलिटी यांचा समतोल राखत आम्ही ग्राहक समाधानाला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत.”

प्रीमियम शोरूम आणि आफ्टर-सेल्स सेवा

नवीन डीलरशिपमध्ये 2,000 चौ.फूटचे प्रशस्त शोरूम आणि 1,000 चौ.फूटचा आधुनिक वर्कशॉप आहे.
ग्राहकांना येथे टेस्ट रायड, फायनान्स सुविधा तसेच विश्वासार्ह आफ्टर-सेल्स सेवा मिळणार आहे.

वॉरंटी तपशील :

  • ब्रिक्स्टन मोटरसायकल्स: 2 वर्षांची स्टँडर्ड + 2 वर्षांची एक्स्टेन्डेड वॉरंटी

  • व्हीएलएफ टेनिस ई-स्कूटर: 3 वर्षांची वाहन वॉरंटी + 3 वर्षांची बॅटरी वॉरंटी

देशभरात विस्ताराचे उद्दिष्ट

मोटोहाऊसने 2026 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत मुंबई, चेन्नई, म्हैसूर, रायपूर, जयपूर, भुवनेश्वर, गुवाहाटी, जम्मू-काश्मीर आणि हैदराबाद येथे 9 नवीन डीलरशिप्स सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पहिल्या वर्षात 5,000 वाहनांची विक्री करण्याचे लक्ष्य कंपनीने निश्चित केले आहे.

किंमती (एक्स-शोरूम, भारत)

  • व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर : ₹1,29,999*

  • व्हीएलएफ मॉबस्टर 135 (पेट्रोल) : ₹1,29,999*

  • ब्रिक्स्टन क्रॉसफायर 500एक्स / 500एक्ससी : ₹3,99,999 पासून*

  • ब्रिक्स्टन क्रॉमवेल 1200 : ₹8,23,778*

  • क्रॉमवेल 1200एक्स (लिमिटेड एडिशन – 100 युनिट्स) : ₹9,73,819*

(*अटी लागू)

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026