चाहत्यांना बॅकस्टेज अॅक्शन, कलाकारांकडून चर्चासत्रे आणि अंकुर तिवारी, ओएएफएफ आणि सवेरा व राशी संघवी यांनी तयार केलेल्या बिहाइंड दि सीन अनुभवाचा आनंद घेता येईल
पुणे, १६ डिसेंबर २०२५: आपल्या पहिल्यावहिल्या जागतिक लाईव्ह म्युझिक पार्टनरशिपचा भाग म्हणून एअरबीएनबी २४ आणि २५ जानेवारी रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या लोल्लापालूझा इंडिया २०२६ मध्ये पाहुण्यांना एक त्यांच्या आवडत्या संगीताच्या जवळ आणणारा एक खास अनुभव देईल. हा भारतातील एअरबीएनबीसाठी एक रोमांचक नवीन अध्याय आहे, जो पर्यटन, संस्कृती आणि सर्जनशीलतेद्वारे लोकांना एकमेकांशी जोडण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.

बॅकस्टेज टूर्स आणि कलाकारांकडून ज्ञानवर्धक सर्जनशील सत्रांपासून ते लोल्लापालूझा इंडिया इनसाइडरच्या माध्यमातून बिहाइंड दि सीन प्रवेशापर्यंत प्रत्येक अनुभव भारतातील सर्वात सुंदर संगीत महोत्सवांपैकी एकाच्या निर्मितीमागील प्रयत्नांची एक अविस्मरणीय झलक देतो.
“लाइव्ह संगीत आणि प्रवास नेहमीच एकमेकांसोबत चालले आहेत – चाहते महोत्सवांना फक्त उपस्थित राहत नाहीत, तर ते त्यांचे आयोजन करणाऱ्या शहरांचा शोध घेतात आणि एकमेकांशी नाते जोडतात. त्यातून आपल्या एखाद्या शहराच्या अनुभवाची व्याख्या निर्माण होते,” असे एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले. “लोलापालूझासोबतची आमची भागीदारी या खास एअरबीएनबी अनुभवांच्या माध्यमातून चाहत्यांना त्या जगाच्या जवळ आणते. त्यामुळे या महोत्सवाचा अनुभव फक्त चाहते म्हणून नव्हे तर त्यांच्या कथेचा भाग असलेल्या व्यक्ती म्हणून घेण्याची दुर्मिळ संधी मिळते.”
लोल्लापालूझा इंडियामध्ये अंकुर तिवारी यांच्या एन्टॉरेजमध्ये सहभागी व्हा
भारतातील ख्यातनाम गायक-गीतकार, संगीतकार आणि कथाकारांपैकी एक असलेल्या अंकुर तिवारींसोबत पडद्यामागील अनुभव घेता येईल. हा खास एअरबीएनबी अनुभव चाहत्यांना अंकुरच्या सर्जनशील जगात प्रवेश करण्यासाठी आमंत्रित करतो. चाहत्यांना दुर्मिळ बॅकस्टेज अनुभव मिळेल, त्याच्या प्रदर्शनपूर्व उपक्रमांचा भाग होता येईल आणि त्यासोबत लोल्लापालूझा इंडियाच्या आफ्टरशोचे आमंत्रणही मिळेल. ही भारतातील ओरिजिनल संगीतांपैकी एक असलेल्या लय, भावना आणि सहकार्याची पडद्यामागील झलक असेल. हा अनुभव २४ जानेवारी २०२६ रोजी घेता येईल. त्यासाठी बुकिंग here येथे करता येईल.
ओएएफएफ आणि सवेरासह स्टेजच्या पलीकडे जाण्याचा अनुभव
भारतातील लोकप्रिय साउंडट्रॅक आणि स्वतंत्र हिट्सच्या मागे असलेल्या ख्यातनाम संगीतकार-निर्माता जोडी ओएएफएफ आणि सवेरा यांना जवळून पाहता येईल. चित्रपट, पॉप आणि प्रायोगिक इलेक्ट्रॉनिक संगीत एकत्र आणणाऱ्या आवाजासह ते भारताच्या विकसित होत असलेल्या समकालीन संगीताचे प्रमुख शिल्पकार ठरले आहेत. या तल्लीन करणाऱ्या एअरबीएनबी अनुभवात चाहत्यांना या दोघांसोबत स्टेजच्या मागे घडणाऱ्या घटनांचे साक्षीदार होतील. त्यांना शोपूर्वी होणारी सर्जनशील प्रक्रिया अनुभवता येईल. भारतातील दोन ख्यातनाम कलाकार स्टुडिओपासून स्टेजपर्यंत संगीत कसे जिवंत करतात हे पाहण्याची ही एक दुर्मिळ संधी आहे. हा अनुभव २५ जानेवारी २०२६ रोजी घेता येईल. त्यासाठी बुकिंग करता येईल.
राशी संघवीसोबत पडद्यामागील अनुभवाचा खजिना
भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लोकप्रिय लाइव्ह म्युझिक इव्हेंटपैकी एक असलेला शो कशा रितीने घडतो हे जाणून घेण्यासाठी राशी संघवी, लोलापालूझा इंडिया इनसाइडरसोबत सहभागी होता येईल. फेस्टिव्हल प्रोडक्शन आणि जागतिक भागीदारीमागील प्रेरक शक्ती असलेली राशी लाइव्ह एंटरटेनमेंट, ब्रँड समन्वय आणि व्यापक प्रमाणात इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये वर्षानुवर्षांचा अनुभव घेऊन येत आहे. या अनुभवाच्या माध्यमातून राशी आतल्या गोष्टी, रिअल-टाइम माहिती आणि मजेदार अनुभवांची खाण चाहत्यांसमोर उलगडेल. तुम्ही संगीत प्रेमी असा किंवा मोठ्या प्रमाणात लाइव्ह इव्हेंट कसे एकत्र येतात हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल तरी हा अनुभव संगीतामागील जादू पाहण्याची संधी देतो. हा अनुभव २४ जानेवारी २०२६ रोजी घेता येईल आणि here येथे बुक करता येईल.
बुकमायशोचे लाईव्ह इव्हेंट्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी नमन पुगलिया म्हणाले, “लोल्लापालूझा इंडिया कायमच केवळ अत्यंत अद्वितीय कामगिरी करत आले आहे. ते संगीताभोवतीची संस्कृती, समाज आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. एअरबीएनबीसोबत आम्ही चाहत्यांना लोकसंस्कृती, कथा आणि महोत्सवाला आकार देणाऱ्या क्षणांचा अनुभव घेण्याची अभूतपूर्व संधी देऊन नाते अधिक दृढ करत आहोत. हे अनुभव लोल्लापालूझा इंडियाची एक वेगळी बाजू समाजासमोर आणतात जी जी मुख्यत्वे कर्मचारी आणि निर्मात्यांसाठी राखीव असते. त्यामुळे चाहत्यांना जागतिक दर्जाचा महोत्सव कसा जिवंत होतो हे पाहणे शक्य होईल.”
बुकिंग कसे करायचे:
- या अनुभवांसाठीचे बुकिंग १५ डिसेंबर रोजी सुरू होईल.
- चाहत्यांना प्रत्येक अनुभवासाठी प्रथम आलेल्यास प्रथम प्रवेश या तत्वावर सेवा दिली जाईल.
- मुंबई, भारत येथे येण्याजाण्याचा खर्च चाहत्यांची जबाबदारी असेल.
लोल्लापालूझा इंडिया २०२६ चे आयोजन लाँग वीकेंडदरम्यान केले जाणार असल्याने एअरबीएनबी शहरातील सर्वात उत्साहाने गजबजलेल्या परिसरात राहण्याची सुविधा देणार आहे. त्यामुळे उत्सवाचा आणि मुंबईने देऊ केलेल्या सर्व गोष्टींचा आनंद घेणे सोपे होईल.









