नेतृत्व पारदर्शक, प्रगती दिशादर्शक; खानापूर पंचायत समिती गणात धनराज (बाप्पू) जोरी-पाटील यांची दमदार उमेदवारी

By: Editor_Pratik

On: Monday, December 29, 2025 11:36 AM

Google News
Follow Us

खानापूर । विशाल भालेराव

खानापूर पंचायत समिती गण क्रमांक ८४ मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले, सर्वसामान्यांशी थेट नाळ जोडणारे युवा नेतृत्व श्री. धनराज किसन (बाप्पू) जोरी-पाटील यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “नेतृत्व पारदर्शक, प्रगती दिशादर्शक” या ब्रीदवाक्याखाली त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गण क्रमांक ८४ मध्ये सक्रियपणे कार्यरत असलेल्या बाप्पू जोरी-पाटील यांना सामाजिक कार्याचे बाळकडू वडील कै. किसन बाप्पू जोरी-पाटील यांच्याकडून मिळाले. लोकनेते म्हणून ओळख असलेल्या वडिलांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत त्यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून आदर्श उपसभापतीपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

परिसरातील नागरिकांच्या हक्कासाठी सदैव उभे राहणारा, एका फोनवर किंवा हाकेला तत्काळ धावून जाणारा नेता म्हणून बाप्पू जोरी-पाटील यांची ओळख आहे. पंचायत समिती गणातील विविध गावांमधील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक निधी मिळवून देण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेत तर कधी मवाळ आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याची कार्यशैली हीच आपली ताकद असल्याचे ते सांगतात. त्यामुळे जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपणास संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला.

निर्व्यसनी, निष्कलंक, प्रामाणिक, अभ्यासू व ध्येयवादी नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केलेले धनराज (बाप्पू) जोरी-पाटील हे “तुमच्यातलाच एक” म्हणून जनतेसाठी सतत झटणारे नेतृत्व असल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे. गणात त्यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून वातावरण तापू लागले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026