कोयता गँगचा थरार; खानापूरमध्ये भरदुपारी एक कोटींचा दरोडा; वैष्णवी ज्वेलर्समधून ८० तोळे सोन्याचे दागिने लंपास

By: Editor_Pratik

On: Saturday, December 27, 2025 5:28 AM

Google News
Follow Us

विशाल भालेराव

खडकवासला : सिंहगड पायथ्याच्या पानशेत रस्त्यावरील वर्दळीच्या खानापूर परिसरात शुक्रवारी (दि. २६) भरदुपारी सशस्त्र दरोड्याची धक्कादायक घटना घडली. मोटारसायकलवरून आलेल्या पाच जणांच्या कोयता गँगने वैष्णवी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानावर दरोडा टाकत सुमारे एक कोटी रुपये किमतीचे ८० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे खानापूरसह सिंहगड, पानशेत, खडकवासला परिसरात खळबळ उडाली आहे.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलींवरून आलेले पाच जण हातात धारधार कोयते घेऊन दुकानात शिरले. सर्वांच्या तोंडाला रुमाल बांधलेले होते. त्या वेळी दुकानात मालक सीताराम बाबर, त्यांचा आजारी मुलगा तसेच दोन महिला कर्मचारी उपस्थित होत्या. दुकानात कोणताही गिऱ्हाईक नसल्याची खात्री करून घेत दरोडेखोरांनी अचानक कोयते बाहेर काढले आणि उपस्थितांना ठार मारण्याची धमकी दिली.

अवघ्या एक ते दोन मिनिटांत दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या व इतर मौल्यवान दागिने असा सुमारे ८० तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लुटला. त्यानंतर ते वेगाने दुकानाबाहेर पळाले आणि काही क्षणांतच मोटारसायकलवरून पसार झाले. दुकानातील कर्मचारी व मालक आरडाओरडा करेपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.

हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला असून फुटेजमध्ये धारधार कोयते घेऊन दागिने लुटतानाचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. भरदुपारी, दाट लोकवस्तीच्या व मुख्य पानशेत रस्त्यालगत असलेल्या भागात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पानशेत, सिंहगडच्या डोंगर-दऱ्या, खोरे तसेच आसपासच्या परिसरात शोधपथके तैनात करण्यात आली आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत दरोडेखोरांचा शोध सुरू होता.
हवेली पोलीस ठाणे यास कडून सखोल तपास चालु असल्याचे सागण्यात आले .

“दरोडा टाकण्याबाबत काही धागेदोरे हाती लागले असून त्यानुसार तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे. घडलेला प्रकार गंभीर असून मी स्वतः घटनास्थळी तळ ठोकून आहे. दरोडेखोरांच्या शोधासाठी परिसर पिंजून काढण्यात येत असून लवकरच त्यांना गजाआड करण्यात येईल.”

— रमेश चोपडे, अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026