दादांचा दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत दाखल

By: Editor_Pratik

On: Monday, December 29, 2025 10:55 AM

ajit pawar
Google News
Follow Us

पुणे : महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना अद्याप अनेक पक्षांत उमेदवार निश्चित न झाल्याने इच्छुकांची घालमेल सुरू असल्याचे चित्र आहे. मुंबई आणि पुणे महापालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, या पार्श्वभूमीवर नाराज इच्छुकांकडून ऐनवेळी पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आले असताना, Nationalist Congress Partyकडून काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का देण्यात आला आहे. काँग्रेसचे माजी उमेदवार दत्ता बहिरट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, ते अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत.

दत्ता बहिरट यांनी यापूर्वी काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे देखील अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘जिजाई’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील जागावाटप आणि उमेदवारांबाबत त्यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026