पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 34 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ उमेदवार भूपेंद्र मोरे यांना विविध समाजघटकांकडून जाहीर व ठाम पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या प्रभागातील राजकीय वातावरणात चांगलीच हालचाल निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय बंजारा परिषद, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेशनाना राठोड यांनी भूपेंद्र मोरे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच नऱ्हे गावातील वडार समाजाचे मान्यवर व प्रभावी नागरिक समिर अलकुंटे आणि सुरज दांगडे यांनीही एकमुखी पाठिंबा दिला आहे.
भूपेंद्र मोरे हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी सातत्याने जोडलेले नेतृत्व असून, प्रभागाच्या विकासासाठी त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त करण्यात आला.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि मूलभूत सुविधा या प्रश्नांवर मोरे प्रभावीपणे काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्र. 34 मधील निवडणूक लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून श्री भूपेंद्र मोरे निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्या अगोदरच त्यांना पाठिंबा समर्थन मिळू लागल्याने निवडणूक चांगलीच रंगणार आहे…
या पाठिंबाबद्दल श्री भूपेंद्र मोरे यांनी समस्त बांधवांचे आभार मानले. व आगामी काळामध्ये ही कार्य करण्यासाठी तत्पर राहू असे आश्वासन यावेळी दिले.









