Bank Holiday Next Week : ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत बँकांना एकूण चार दिवस सुट्टी असणार आहे. मात्र या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये सारख्या नसून स्थानिक आणि प्रादेशिक सणांवर अवलंबून असतील. त्यामुळे बँकिंग कामांसाठी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांनी नियोजन करूनच शाखेला भेट देणे आवश्यक आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, प्रत्येक रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतात. याशिवाय विविध राज्यांमधील स्थानिक सण आणि विशेष निमित्तांनुसारही सुट्ट्या लागू होतात.
येत्या आठवड्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त इतर दोन दिवशीही काही भागांमध्ये बँका बंद राहणार आहेत :
🔹 ९ डिसेंबर (मंगळवार) – कोची आणि तिरुवनंतपुरम येथे बँका बंद. म्हणजेच केरळमध्ये या दिवशी बँका कार्यरत राहणार नाहीत. देशातील इतर भागांत मात्र सेवासुरू राहील.
🔹 १२ डिसेंबर (शुक्रवार) – मेघालयमध्ये बँकांना सुट्टी. पा तोगन नेंगमिंजा संगमा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
रिझर्व्ह बँकेनुसार डिसेंबर २०२५ मध्ये एकूण १८ बँक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यापैकी अनेक फक्त ठराविक राज्यांनुसार लागू होतील. २५ डिसेंबरला नाताळ असल्याने त्या दिवशी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
ग्राहकांनी ब्रँचला जाण्यापूर्वी सुट्टीची माहिती पडताळून पाहणे आवश्यक आहे; अन्यथा आवश्यक कामे अडकण्याची शक्यता आहे.








