School Closed : मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

By: Editor_Pratik

On: Friday, November 28, 2025 4:03 PM

school-holidays-1-jpg-1731597974
Google News
Follow Us

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिला असून, शिक्षक संपावर गेल्यास शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ५ डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षकांच्या मुख्य मागण्या

  • २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये

  • १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा

  • शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी

सध्या राज्यात सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. परीक्षा दिली नाही किंवा उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना काम करता येणार नाही. या निर्णयाला शिक्षकांनी तिव्र विरोध दर्शवला असून, तो रद्द करण्याची मागणी केली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास संप करणार असल्याचा मुख्याध्यापक महामंडळाचा इशारा आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026