Nagarparishad Election BIG Update : प्रचार संपायला केवळ काही तास बाकी असतानाच राज्यातील तीन नगरपरिषद निवडणुकींना ब्रेक! न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने घेतला हा निर्णय

By: Editor_Pratik

On: Sunday, November 30, 2025 4:04 AM

Google News
Follow Us

Nagarparishad Election BIG Update : प्रचार संपायला केवळ काही तास बाकी असतानाच राज्यातील तीन नगरपरिषद निवडणुकींना ब्रेक! न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने घेतला हा निर्णय

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा प्रचार आज दुपारी पाच वाजता थांबणार आहे. त्यानंतर मंगळवारी मतदान प्रक्रिया होणार होती. मात्र, याआधीच महत्त्वाची घडामोड घडली आहे. बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदान आता अनुक्रमे 20 आणि 21 डिसेंबरला होणार आहे. यासंबंधी जिल्हा न्यायालयात दाखल याचिकेवर निर्णयासाठी न्यायालयाने आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे.

बारामतीमध्ये उमेदवारी अर्जाची मुदत दुपारी तीनपर्यंत असतानाही अर्ज स्वीकृती प्रक्रिया पावणेतीन वाजताच स्थगित केली गेल्याने वाद निर्माण झाला होता. अर्ज दाखल प्रक्रियेत झालेल्या त्रुटींवर तसेच काही उमेदवारांविरोधात न्यायालयात आव्हान दिल्याने आयोगाने निवडणूक स्थगित केली. न्यायालयाने भाजपच्या दोन उमेदवारांना अंतिम मुदत संपल्यानंतरही अर्ज स्वीकारण्याचे निर्देश दिल्याचेही समजते.

महाबळेश्वर आणि फलटणप्रमाणेच आता बारामतीची निवडणूक देखील स्थगित करण्यात आली आहे. आयोगाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. नगराध्यक्षपदासह सात प्रभागांत उमेदवारीवर दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही अपीलची मुदत संपली नसल्याचा मुद्दा पुढे करण्यात आला.

बारामतीतील नगराध्यक्ष पदासह सात जागांचा विचार करून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.

नव्या तारखा पुढीलप्रमाणे:

  • 4 डिसेंबर: नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर

  • 10 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख

  • 11 डिसेंबर 2025: अंतिम उमेदवारांची यादी जाहीर

  • 20 डिसेंबर: मतदान (सायं. 5.30 पर्यंत)

  • 21 डिसेंबर: मतमोजणी आणि निकाल

नव्याने कोणतीही उमेदवारी दाखल करता येणार नाही.

Local Bodies Election: राज्य निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण

महापालिका-नगरपरिषद निवडणुकांसाठी राज्यात एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवडणुकीसाठी EVMची तयारी पूर्ण असून 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिट्स उपलब्ध आहेत.

राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायती (एकूण 288) सदस्यपदांसाठी तसेच थेट नगराध्यक्ष पदांसाठी मतदान 2 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होईल. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026