‘पुरुषाचं आयुष्य खरंच इतकं कठीण?’ ३ दिवसांपूर्वी नोकरी गेली, घरी कोणी विचारपूसही करत नाही; तरुणाचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

By: Editor_Pratik

On: Friday, November 28, 2025 2:29 PM

Google News
Follow Us

‘पुरुषाचं आयुष्य खरंच इतकं कठीण?’ ३ दिवसांपूर्वी नोकरी गेली, घरी कोणी विचारपूसही करत नाही; तरुणाचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

आजच्या जगात पैसा नसला की माणसाची किंमत कमी होते, हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. स्वभाव कितीही चांगला असो, पण आर्थिक स्थिती ढासळली तर घरातील लोक देखील बदललेलं वागणं दाखवतात, असं अनेकांना अनुभवायला येतं. याच विषयावर आधारित एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Indiaonfeed.in या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो सध्या चर्चेत आहे. व्हिडीओमधील तरुण सांगतो की, तीन दिवसांपूर्वी त्याची नोकरी गेली आणि तो घरी आला. पण यावेळी घरचं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. तो म्हणतो, “पूर्वी जेव्हा घरी यायचो तेव्हा आई प्रेमानं विचारायची, वाढायची… पण आता फक्त शांतता. दोन पोळ्या जास्त हव्यात असं म्हटल्यावर बाबांनी उपरोधात हसत विचारलं – अजून कशाचं?”

तो पुढे म्हणतो, “पुरुष कमाई करत नाही तोवर त्याचा मान-सन्मान नसतो. पैसा असेल तेव्हाच समाज आणि कुटुंब तुमची किंमत करतात.”

आतापर्यंत २ लाख ७६ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तरुणाने नोकरी गेल्यानंतर पुरुषांवर होणारा मानसिक ताण आणि कुटुंबातील बदललेली वागणूक याचं प्रभावी दर्शन घडवलं आहे. हा मनाला चटका लावणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतं, “या जगात पैसा नसला की माणूस काहीच नाही,” तर काहींच्या मते, “हेच पुरुषाचं खरं आयुष्य!”

तुम्हाला काय वाटतं? अशा प्रसंगात पुरुषांच्या भावनांचं महत्त्व किती आहे? तुमचा अभिप्राय सांगा!

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026