प्रवाशांसाठी खुशखबर…! हिवाळी विशेष तीन रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ

By: Editor_Pratik

On: Saturday, November 29, 2025 1:40 PM

Google News
Follow Us

प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी…! हिवाळी हंगामात वाढलेल्या गर्दीचा विचार करून पुणे रेल्वे विभागातील तीन विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या गाड्यांच्या तब्बल २५ अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

बिकानेर – साईनगर शिर्डी (04715) ही साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार होती. मात्र प्रचंड प्रवासी प्रतिसादामुळे या गाडीचा कालावधी वाढवून 27 डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे. तसेच साईनगर शिर्डी – बिकानेर (04716) ही विशेष गाडी आता 28 डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

अजमेर – दौंड – अजमेर (09625) या साप्ताहिक विशेष गाडीच्या चार अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्या असून ही गाडी आता 25 डिसेंबरपर्यंत धावेल. तर दौंड – अजमेर (09626) विशेष गाडीचा कालावधी वाढवून 26 डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे.

अजमेर – सोलापूर – अजमेर (09627) या साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी वाढवून 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे. तर सोलापूर – अजमेर विशेष गाडी (09628) ही पूर्वी 4 जानेवारीला धावणार होती, ती आता थेट 1 जानेवारी 2025 रोजी धावणार आहे.

यामुळे प्रवाशांना प्रवास नियोजनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026