अनिमियाविरोधात राष्ट्रीय स्तरावर मोहिम राबवली जाणार
विज्ञान आणि निसर्गाच्या समन्वयावर आधारित सर्वांगीण आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणा-या अर्थ बाय एमक्युर या जगप्रसिद्ध ब्रँण्डने नवा उपक्रम जाहीर केला आहे. माणसाच्या शरीरातील लोहाच्या कमतरतेविरोधात जनजागृतीपर दिवस म्हणून जगभरात वर्ल्ड आयर्न डेफिशिअन्सी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्यानिमित्ताने प्रसिद्ध क्रिकेटपटू एम.एस.धोनी यांच्यासोबत प्रभावी उपक्रम सुरु केला आहे. ‘इन्वेस्ट इन आयर्न’ असे या मोहिमेचे नाव असून, जनतेला अनिमिया सारख्या गंभीर आजाराबाबत जागरुकता निर्माण करणे आणि शरीरात लोहाचे महत्त्व समजावणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शरीराची ऊर्जा कायम अबाधित ठेवणे, दैनंदिन कामकाजात उत्साही राहणे, आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोहाची आवश्यकता भासते. शरीरात लोहाचे महत्त्व समजावून देण्यासठी या उपक्रमाच्या माध्यमातून साध्या आणि सोप्या भाषेत माहिती प्रसारित केली जाईल. ही मोहीम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्यास प्रत्येकाला आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य प्रमाणात राखता येईल, असा विश्वास आयोजनकर्त्यांनी व्यक्त केला.
अनेक भारतीयांमध्ये लोहाची कमतरता आढळून येत आहे. शरीरात लोहाची कमतरता ही गंभीर स्वरुपातील शारिरीक समस्या मानली जाते. थकवा किंवा सतत दम लागण्यावर अनेकजण दुर्लक्ष करतात. सतत जाणवणारा थकवा हा दैनंदिन कार्यक्षमतेवर, एकाग्रतेवर तसेच आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होतो. अनेक अहवालांनुसार, तब्बल ५७ टक्के भारतीय महिलांना अनिमियाची कमतरता जाणवते. शरीरातील अनिमियाची समस्या दूर सारायची असेल तर वेळेवर निदान होणे आवश्यक आहे. योग्य वेळी तपासणी आणि उपचार केल्याने या आजारावर यशस्वीरित्या मात करता येते.
प्रसिद्ध क्रिकेटपटू एम.एस.धोनी आपल्या शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. सर्व वयोगटात त्याचा चाहतावर्ग आहे. धोनीचे स्वभावगुण तसेच देशभरातील प्रचंड लोकप्रियता ध्यानात घेत या मोहिमेसाठी त्याची निवड विश्वासार्ह ठरते. मोहिम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता एक चित्रफित निर्माण करण्यात आली आहे.
तुमच्या शरीरात लोहाच्या कमतरतेची लक्षणे दिसून आल्यास दुर्लक्ष करु नका, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्या. शरीरात लोहाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला क्रिकेटपटू एम.एस.धोनी देतात.
मोहिमेबद्दल एमक्युअर फार्माक्युटिकल्सच्या कार्यकारी संचालिका नमिता ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘लोकांना जागरुक करणे ही आमची प्रमुख भूमिका असते. आम्ही याअगोदर लोकांना पुरेशा झोपेचे महत्त्व समजावले. आता शरीरातील लोहाचे प्रमाण कितपत महत्त्वाचे आहे, याबद्दल आम्ही माहिती देत आहोत.
योग्य माहितीच्या आधारे लोकांना आरोग्याविषयी पुरेशी माहिती मिळेल, याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. इन्व्हेस्ट इन आयर्न या मोहिमेद्वारे आम्ही देशवासीयांना सांगू इच्छितो की, ‘‘शरीरातील लोहाच्या प्रमाणाबाबत नियमित तपासणी करणे हे दैनंदिन ऊर्जा आणि आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक असते. ही छोटीशी गुंतवणूक भविष्यात लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लावते.’’
शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी हा ब्रँड लोकांना वैद्यकीय तपासणी करण्यासह लोहाचे प्रमाण अबाधित राखण्यासाठी वेगवेगळे पर्याय स्विकारण्यासाठी प्रोत्साहित करतो. फेरस अस्कॉर्बेटचा समावेश असलेले अर्थ आयर्न गमीजमध्ये पुरेसे लोह आढळतात. बाजारात उपलब्ध आयर्न सॉल्ट्स आणि सप्लिमेंट्सच्या तुलनेत या गमीजमध्ये ६७ टक्के अधिक शोषणयुक्त लोक आढळते.
सततचा थकवा दूर करण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी हे गमीज फायदेशीर ठरतात. हे गमीज खाण्यासाठी सौम्य तसेच पचनाला अनुकूल असल्याने पारंपरिक आयर्न सप्लिमेंट्स घेणा-यांनाही आता सोप्पा पर्याय उपलब्ध झाला आहे.
‘इन्व्हेस्ट इन आयर्न’ या मोहिमेतून अर्थचे उद्देश्यपूर्ण आणि आरोग्यकेंद्रित कार्यपद्धती प्रतिबिंबित होतात. या मोहिमेद्वारे अर्थ लोकांना आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहण्याचे, आरोग्याला प्राधान्य देण्याचे तसचे याकरिता आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित करते. या प्रयत्नांचे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येतात.








