“BlinkIt चा डिलिव्हरी बॉय माझ्या घरी रडत आला होता”, ग्राहकाने रेडिटवर सांगितला धक्कादायक अनुभव; युजर्स म्हणाले…

By: Editor_Pratik

On: Sunday, November 2, 2025 1:15 PM

Blinkit
Google News
Follow Us

BlinkIt Delivery Boy Crying Story : एका रेडिट युजरने ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयबाबतचा त्याचा अनुभव शेअर केला आहे. रेडिटवर केलेल्या पोस्टमध्ये युजरने सांगितले की, या डिलिव्हरी बॉयने त्याने मागवलेली वस्तू गहाळ केली होती. याबाबत तक्रार केल्यानंतर डिलिव्हरी बॉयच्या पगारातून वस्तूची रक्कम कापली गेली. यामुळे हा डिलिव्हरी बॉय रडत रडत युजरच्या घरी पोहोचला होता.

या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी म्हटले की, डिलिव्हरी बॉयल उगाचच दंड सहन करावा लागला. तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की, डिलिव्हरी बॉयवर खरेच अन्याय झाला आहे की हा कोणता स्कॅम आहे?

या रेडिट युजरने पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, त्याने ब्लिंकिटवरून सुमारे ५०० रुपये किमतीची सॅलिसिलिक अॅसिड सीरमची एक छोटी बाटली मागवली होती. जेव्हा डिलिव्हरी बॉय पार्सल देऊन गेला, तेव्हा युजरला पार्सल तळाशी फाटलेले आढळले आणि त्यामध्ये सीरमची बाटली नव्हती.

यानंतर युजरने ब्लिंकिट सपोर्टशी संपर्क साधला आणि मागवलेली वस्तू पार्सलमध्ये नसल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर ब्लिंकिटकडून युजरला सर्व ५०० रुपयांची रक्कम परत मिळाली.

पोस्टनुसार, काही तासांनंतर डिलिव्हरी बॉय रडत रडत युजरच्या घरी पोहचला. “ब्लिंकिटने माझ्या पूर्ण दिवसाच्या पगारातून ५०० रुपये कापले आहेत. याचबरोबर इन्सेंटिव्हही दिला नाही. यामुळे माझे सुमारे ७०० रुपये नुकसान झाले आहे. याचबरोबर माझे अकाउंटही ब्लॉक केले आहे”, असे डिलिव्हरी बॉयने सांगितले, असे युजरने पोस्टमध्ये म्हटले आहे.

यानंतर पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया आल्या. एक रेडिट युजर म्हणाला, “खरेच, यामध्ये डिलिव्हरी बॉयची चूक नाही की हा एखादा स्कॅम आहे.”

यावेळी एका युजरने क्विक कॉमर्स उद्योगातील कामाच्या परिस्थितीवर टीका केली. ठया कंपन्या खरोखरच असे काही करत असतील तर मला आश्चर्य वाटणार नाही. मी ऐकले आहे की, त्या ठिकाणी कामाच्या परिस्थिती भयानक आहे”, असे तो म्हणाला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026