मोठी बातमी! मनसे नेते राजू पाटील यांच्या भावाची ईडीकडून तब्बल 10 तास चौकशी; नेमकं प्रकरण काय?

By: Editor_Pratik

On: Thursday, November 13, 2025 12:24 AM

Google News
Follow Us

मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची ईडीकडून तब्बल 10 तासांहून अधिक चौकशी करण्यात आली आहे. आज सकाळी सात वाजता चौकशीला सुरुवात झाली आणि संध्याकाळी पाचपर्यंत ती सुरू होती. यानंतर आता ईडी त्यांच्या पुन्हा एकदा चौकशीची शक्यता वर्तवत आहे. लवकरच त्यांना ईडी कार्यालयात पुन्हा हजेरी लावावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

ही चौकशी लोढा ग्रुपच्या विश्वस्त फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा, विनोद पाटील यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला या प्रकरणाची तपासणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होती. त्यानंतर आता ईडीही या तपासात सक्रिय झाली आहे.

राजेंद्र लोढा यांनी केलेल्या जमीन व्यवहारातील अनियमितता आणि टीडीआरशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार याबाबत चौकशी सुरू आहे. विश्वस्तांचा विश्वासघात आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी राजेंद्र लोढांनंतर आता विनोद पाटील यांच्यावरही समांतर चौकशी सुरू झाली आहे.

ईडीने आज विनोद पाटील यांचा सविस्तर जबाब नोंदवून पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. यामुळे आता या प्रकरणात विनोद पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026