आशियातील आघाडीची एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणारी संस्था, अपोलो हॉस्पिटल्सने आज पुण्यातील स्वारगेट येथे आपले नवे हॉस्पिटल सुरु केले. या हॉस्पिटलची सुरुवात टप्प्याटप्प्याने होईल, सध्या २५० बेड्स उपलब्ध आहेत. राज्यातील या भागात आरोग्य देखभाल गरजांना ध्यानात ठेवून त्या पूर्ण करण्यासाठी आरोग्य सेवा क्षमता अजून जास्त वाढवण्याची अपोलो हॉस्पिटल्सची योजना आहे.
अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ प्रताप सी रेड्डी यांनी सांगितले, “अपोलोमध्ये आमचे मिशन आहे, भारताच्या बरोबरीने संपूर्ण जगासाठी आरोग्य सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणणे. ‘हील इन इंडिया – हील बाय इंडिया‘ व्हिजनने प्रेरित होऊन आम्ही असे स्थान निर्माण करत आहोत जिथे जगभरातील लोकांना करुणा आणि सामर्थ्य यांच्या बरोबरीनेच क्लिनिकल उत्कृष्टतेचे लाभ मिळत आहेत. आमची इच्छा आहे की पुणे आणि भारतातील प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा निवास सदैव राहो.”
अपोलो हॉस्पिटल्सने आपल्या पुढील विस्तारासाठी पुण्याची निवड केली कारण त्यांनी ओळखले की या क्षेत्रातील लोकांच्या आरोग्यसंबंधी गरजा बदलत आहेत. त्यांनी आपल्या विस्तार योजना अशा पद्धतीने बनवल्या आहेत की नवीन, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरातील विविध लोक, समुदाय आणि संबंधित हितधारकांची ते अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकतील.
अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ प्रीता रेड्डी यांनी सांगितले, “अपोलो हॉस्पिटल्स पुणेमध्ये आम्ही क्लिनिकल उत्कृष्टता, करुणामय देखभाल आणि अथक नावीन्य यांच्या बळावर निर्माण केलेला, चार दशकांहून अधिक काळापासून चालत आलेला वारसा पुढे नेत आहोत. हे नवे हॉस्पिटल आरोग्य सेवांपर्यंत पोहोच आणि गुणवत्ता यांना पुढे नेण्याच्या आमच्या अचल बांधिलकीचे प्रतीक आहे, हे हॉस्पिटल सुरु करून आम्ही रुग्णांनी गेल्या अनेक पिढ्यांपासून आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान करत आहोत.”
अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती सुनीता रेड्डी यांनी सांगितले, “आमचे पुणे हॉस्पिटल अपोलोच्या वाढत्या राष्ट्रीय विस्तारामध्ये उचलण्यात आलेले एक धोरणात्मक पाऊल आहे, जे भारतातील एका सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या आरोग्य सेवा बाजारपेठांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त लोकांना उच्च स्तरीय क्वाटर्नरी देखभालीचे लाभ देण्यासाठी आमची एकात्मिक आरोग्य इकोसिस्टिम शहरात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्रात आरोग्य देखभालीचे मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज नेटवर्क तयार करण्यासाठी पुण्यातील क्लिनिकल टॅलेंटसोबत सहयोग करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
अपोलो हॉस्पिटल्सचे समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ मधू ससिधर यांनी सांगितले, “आमचे पुणे हॉस्पिटल सुरक्षा विज्ञान, पुराव्यांवर आधारित प्रॅक्टिस आणि एका अशा संस्कृतीच्या पायावर उभारण्यात आले आहे, ज्यामध्ये सर्व निर्णय रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात. जसजसे आम्ही पुढे जाऊ, रुग्णांच्या देखभालीप्रती आमची बांधिलकी मजबूत होत जाईल, जी उच्च दर्जा, पारदर्शक परिणाम, करुणा आणि क्लिनिकल दृढतेच्या माध्यमातून प्रदान केली जाईल.”
अपोलो हॉस्पिटल्सला अभिमान आहे की, पुण्यासारख्या आयटी इनोव्हेशन आणि सर्वसमावेशक शहर उभारणीचे केंद्र असलेल्या, त्याठिकाणच्या वेगवान इकोसिस्टिमचा ते एक भाग बनत आहेत. अपोलो हॉस्पिटल्स पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मनीषा कर्माकर यांनी सांगितले, “पुणे शहरामध्ये आमचे नवे हॉस्पिटल क्लिनिकल उत्कृष्टतेप्रती अपोलोची बांधिलकी दर्शवते, इतकेच नव्हे तर एका अशा शहराच्या विकास आणि कल्याणमध्ये योगदान देत आहे जे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचे केंद्र म्हणून भारताच्या भविष्याला आकार देत आहे.”
अपोलो हॉस्पिटल्स पुणे पश्चिम भारतात उच्च दर्जाच्या, तंत्रज्ञान-सक्षम देखभाल सेवासुविधांच्या जाणीवपूर्वक विस्ताराचे नेतृत्व करत आहे. या एकाच ठिकाणी एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रगत सर्जिकल रोबोटिक्स, अचूक ऑन्कोलॉजी, व्यापक क्रिटिकल केअर आणि कार्डियाक सायन्स, ट्रान्सप्लांट, ऑर्थोपेडिक्स तसेच माता आणि बाल आरोग्यातील विशेष कार्यक्रम उपलब्ध आहेत. या रुग्णालयाची रचना या प्रदेशातील आरोग्य देखभाल क्षमता वाढवण्यासाठी केली गेली आहे. या ठिकाणी मॉड्यूलर ओटी (ऑपरेशन थिएटर) प्रमाणित गुणवत्तेची पूर्तता करतात.
एकात्मिक आयसीयू आणि नवजात बालकांसाठीची युनिट्स या प्रदेशातील क्रिटिकल केअरमधील कमतरता दूर करतात. आयओटी-संचालित देखरेख प्रणाली, टेलिहेल्थ कनेक्टिव्हिटीसह, रुग्णाच्या उपचार प्रवासात सातत्य राहील हे सुनिश्चित करतात. मल्टी-डिसिप्लिनरी क्लिनिकल टीम आणि पुराव्यावर आधारित प्रोटोकॉलसह, हे रुग्णालय अपोलोला त्यांच्या रुग्णांना सातत्याने सुधारित परिणाम देण्यास, क्वाटर्नरी विस्ताराला अधिक खोलवर नेण्यास आणि जटिल आरोग्य समस्यांसाठी देखभालीचे प्रादेशिक संदर्भ केंद्र म्हणून काम करण्यास मदत करेल.








