Pune–Mangaon Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. डोंगरावरून कोसळलेला मोठा दगड धावत्या कारच्या सनरूफवर आदळत थेट आत शिरला. दगड महिलेच्या डोक्यावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती असे असून, त्या पुण्याहून रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे जात होत्या.
ही दुर्घटना कोंडेथर गावाजवळ घडली. अपघातावेळी कारमध्ये इतर प्रवासीही होते; मात्र सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रवाना केला. इतर प्रवाशांचे जबाब नोंदवून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दरडीचा दगड कोसळून सनरूफ तुटल्याचे व्हिडिओही समोर आले असून, घाटातून प्रवास करताना विशेषतः सनरूफ वापरणाऱ्यांनी अतिरिक्त काळजी घेण्याचा इशारा देण्यात येत आहे.









