गुडन्यूज ! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

By: Editor_Pratik

On: Tuesday, October 28, 2025 4:19 PM

Google News
Follow Us

मुंबई : पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा घटक) तर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील विविध गृहनिर्माण योजनांमधील एकूण ४,१८६ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. अर्ज आता २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येणार आहेत. त्यामुळे इच्छुक नागरिकांना घर खरेदीची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, या गृहलॉटरीची संगणकीय सोडत ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता पार पडणार आहे. अर्जदारांना २० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम भरता येईल, तसेच २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS/NEFT द्वारे भरणा करण्याची सोय उपलब्ध असेल.

पुणे मंडळाने जाहीर केलेल्या या सोडतीत एकूण चार घटकांचा समावेश आहे :

  • म्हाडा गृहनिर्माण योजना (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) – १,६८३ सदनिका

  • प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – २९९ सदनिका

  • १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (PMRDA क्षेत्रात) – ८६४ सदनिका

  • २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना (PMC, PCMC व PMRDA क्षेत्रात) – ३,२२२ सदनिका

अर्ज कसा करावा?

म्हाडाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी सांगितले की, अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. ती लक्षात घेऊन ही वाढ देण्यात आली आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांसाठी https://lottery.mhada.gov.in आणि https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळांवर नोंदणी करता येईल. तसेच अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जासंदर्भात मदतीसाठी नागरिकांनी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

म्हाडाने कोणत्याही व्यक्तीला प्रतिनिधी, सल्लागार किंवा प्रॉपर्टी एजंट म्हणून नियुक्त केलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी अशा कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करू नयेत; अन्यथा पुणे मंडळ कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असा इशाराही मंडळाने दिला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026