दै. आरंभ पर्वतर्फे दिवाळी विशेषांकासाठी लेख, कविता, साहित्य पाठविण्याचे आवाहन

By: Editor_Pratik

On: Thursday, October 16, 2025 9:28 AM

aparv logo
Google News
Follow Us

पुणे : दै. आरंभ पर्व या दैनिकातर्फे प्रकाशित होणाऱ्या “दिवाळी विशेषांक २०२५” साठी साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी साहित्यातील नवोदित तसेच अनुभवी लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी यांनी या विशेषांकासाठी आपली रचना पाठवावी, असे आवाहन संपादक मंडळाने केले आहे.

या विशेषांकासाठी कथा, कविता, लेख, अनुभवकथन, व्यक्तिचित्र, प्रेरणादायी लेख, प्रवासवर्णन, लघुनिबंध, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण आणि समकालीन विषयांवरील लेखन आमंत्रित आहे. वाचकांना विचार करायला प्रवृत्त करणारे आणि सर्जनशीलतेला चालना देणारे लिखाण प्राधान्याने प्रकाशित केले जाणार आहे.

साहित्य पाठविताना लेखकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि छायाचित्र अनिवार्यपणे जोडावे. लेखन Unicode (मराठी टायपिंग फॉरमॅट) मध्येच ई-मेलद्वारे पाठविण्याची विनंती आहे.

लेखन पाठविण्याचा ई-मेल पत्ता: 📩 aparvinfo@gmail.com

संपर्क क्रमांक: ☎️ 7276314142

दै. आरंभ पर्वचा दिवाळी विशेषांक वाचकांसाठी दरवर्षी साहित्यिक आनंदसोहळा ठरतो. या वर्षीही तितक्याच उत्साहात आणि नव्या उमेदीने वाचक व लेखकांच्या सहभागातून विशेषांक अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026