पुणे प्रहार डेस्क । आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर हडपसर ते दिवेघाट दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवेघाट परिसरात ब्लास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिली आहे.
या पार्श्वभूमीवर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेत या मार्गाने प्रवास टाळावा, तसेच वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन NHAI कडून करण्यात आले आहे.
रस्ता रुंदीकरणाचे हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार असून, नागरिकांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल प्राधिकरणाने दिलगीरी व्यक्त केली आहे.







