बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कहर काही केल्या थांबत नाही. किरकोळ कारणावरून होणाऱ्या मारहाणीच्या घटना, कौटुंबिक वादातून होणाऱ्या हत्या आणि लाठ्या, काठ्या, कोयते, सत्तूर अशा शस्त्रांचा वाढता वापर, हे आता येथे नवे राहिलेले नाही. दरम्यान, परळी तालुक्यातील हेळंब गावात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने जिल्हा हादरून गेला आहे.
भावकीतील काही लोकांनी घरात घुसून पित्याला आणि त्याच्या तीन मुलांना लाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. याच दरम्यान, त्याच कुटुंबातील एका मुलीला विष पाजल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. मारहाणीत चारही जण बेशुद्ध झाले, तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. (Crime News)
Pune Jain Boarding : राजकारणात माझ्या तोलाचा ‘मर्द’ भेटलाच नाही : धंगेकर
या घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला असून, जखमी कुटुंब पोलिस ठाण्यात गेले असता त्यांची तक्रार स्वीकारली गेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. मात्र त्यांनादेखील “अंबाजोगाईला जाऊन निवेदन द्या,” असे सांगण्यात आले. न्यायासाठी आकांत करणाऱ्या या कुटुंबाने आता थेट पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मदतीची हाक दिली आहे.
परळी तालुक्यातील हेळंब गावात घरात घुसून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. लाठ्या, काठ्या, दांडक्यांनी बेदम मारहाण करत वडिलांसह तीन मुलांना गंभीर जखमी करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी कुटुंबातील एका मुलीला विष पाजल्याचाही धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या वडिलांनी सांगितले की, “या लोकांवर पूर्वी छेडछाड आणि मारहाणीची तक्रार दाखल केली होती. ती केस मागे घे नाहीतर जीव मारू, अशी धमकी देत त्यांनी कुऱ्हाडीचा दांडा, काठ्या घेऊन माझ्या मुलांसह मला मारहाण केली. आम्ही सर्वजण बेशुद्ध पडलो. एका मुलीला विष पाजले. गावकऱ्यांनी आम्हाला दवाखान्यात नेले. पोलीस ठाण्यात गेलो तर अंबाजोगाईला जाण्यास सांगितले.”
या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चार–पाच आरोपी पीडित वडील वासुदेव आंधळे यांना निर्दयपणे मारहाण करताना दिसतात. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीलाही आरोपीने ढकलत बेदम मारहाण केली. घटनेदरम्यान घरभर भीषण किंकाळ्या घुमत होत्या.
😨 लाडक्या बहिणींची चिंता वाढली! आता १८ नोव्हेंबरपूर्वी e-KYC करणे आवश्यक 💰
मारहाणीत वडील आणि मुले सर्वजण बेशुद्ध पडले, तर आरोपी फरार झाले. तक्रार नोंदवण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात गेल्यावरही पोलिसांनी दाद दिली नाही, असा आरोप कुटुंबाने केला आहे. शेवटी वसुदेव आंधळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली, मात्र तिथूनही अंबाजोगाईला निवेदन देण्यास सांगितले गेले. त्यामुळे हताश झालेल्या कुटुंबाने आता पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी केली आहे.









