ब्रेकअपनंतर भेटायला बोलावून ‘एक्स’वर हल्ला; तरुणाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

मुंबई : काळाचौकी परिसरात एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करून स्वतःचेही आयुष्य संपवले, अशी धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आंबेवाडी येथे राहणारा सोनू बराय (२४) याचे त्याच परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु, सुमारे दहा दिवसांपूर्वी दोघांमध्ये गैरसमजांमुळे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर सोनू मानसिक तणावात होता. शुक्रवारी सकाळी त्याने तरुणीला भेटायला बोलावले.

अघोरी प्रकार उघडकीस: रस्त्याच्या मध्यभागी प्राण्याचं काळीज ठेवून भानामती, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

भेटीदरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि संतापाच्या भरात सोनूने तिच्यावर बेदम मारहाण केली. त्यानंतर चाकूने तिच्यावर वार करून ती गंभीर जखमी केली. जीव वाचवण्यासाठी ही तरुणी जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये धावली, परंतु सोनूने तेथेही पाठलाग करून तिच्यावर पुन्हा हल्ला केला आणि मग स्वतःचा गळा चिरून घेतला.

Satara Crime : चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ

दोघांनाही तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोनूचा मृत्यू झाला, तर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस उपायुक्त आर. रागसुधा यांनी सांगितले.

Satara Crime : चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ

घटनेनंतर नर्सिंग होममध्ये सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. वर्दळीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. प्रारंभिक चौकशीत हे प्रकरण प्रेमसंबंधातील वादातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे.