पाच स्थानके

मार्केट यार्ड

बिबवेवाडी-सहकारनगर

पद्मावती

बालाजीनगर

कात्रज

प्रकल्पाचा खर्च

– पुणे महानगरपालिका : २२७.४२ कोटी रुपये

– युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेचे (ईआयबी) द्विपक्षीय कर्ज : ३४१.१३ कोटी रुपये

– राज्य शासनाचे दुय्यम कर्ज : ४५.७५ कोटी रुपये

– राज्य शासनाचे अतिरिक्त बिनव्याजी दुय्यम कर्ज : ६८.८१ कोटी रुपये

– एकूण खर्च – ६८३.११ कोटी रुपये

‘गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकल्पाच्या स्थानकांबाबत आणि अतिरिक्त खर्चाबाबत पाठपुरावा आणि अभ्यास सुरू होता. स्थानिक मागण्यांचा विचार करून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पुणे शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन स्थानकांमुळे दक्षिण पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.’- अजित पवार, उपमुख्यमंत्री

महामेट्रोकडून या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली असून, सहा कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. तांत्रिक आणि कार्यक्षमतेच्या पातळीनुसार एका कंपनीची नियुक्ती करण्यात येत असून वित्त पुरवठासंदर्भात प्रक्रिया पार पाडून लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.- श्रावण हर्डीकर,व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो