Pune Crime : जे व्हायचं ते झालंच; गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार; नाना पेठेत तरुणाची हत्या

By: Editor_Pratik

On: Friday, September 5, 2025 3:58 PM

Google News
Follow Us

Pune Crime : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नाना पेठ परिसरात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर सलग तीन गोळ्या झाडत त्याची हत्या केली. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव गोविंदा गणेश कोमकर असून तो वनराज आंदेकर हत्येतील मुख्य आरोपी संजीवनी कोमकरचा पुतण्या आहे. विशेष म्हणजे, कोमकर स्वतःही गुन्हेगारी प्रकरणात आरोपी होता आणि काही काळ तुरुंगात राहिला होता.

पुण्याच्या गुन्हेगारी जगतात आंदेकर कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास पाच दशकांहून अधिक जुना आहे. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. त्यावेळीच विरोधी टोळीतील गँगवॉर भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

वनराज आंदेकर हत्येच्या प्रकरणात प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाड व इतरांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. तरीदेखील त्यांच्या टोळीने बदला घेण्यासाठी योजना आखल्याची माहिती समोर येत आहे.

बदला घेण्याचा कट आणि पुण्यातील टोळीयुद्ध

माहितीनुसार, गायकवाड टोळीने आंदेकर गटाविरोधात कारवाई करण्याची तयारी सुरू ठेवली होती. काही दिवसांपूर्वी कात्रज भागात सोमनाथ गायकवाडच्या मुलावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र पोलिसांनी तो उधळून लावला. तरीदेखील बदला घेण्याच्या तयारीमुळे नाना पेठेतील गोळीबार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते व निखील आखाडेवर हल्ला केला होता. त्यात निखीलचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून दोन्ही टोळ्यांमध्ये वैर अधिक चिघळले. त्याचा परिणाम म्हणूनच गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांचा खून झाला आणि आता पुन्हा कोमकरवर प्राणघातक हल्ला झाल्याचे उघड झाले आहे.

या घटनेनंतर पुणे पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, गुन्हे शाखा तपासाला लागली आहे. शहरातील वाढत्या गँगवॉरमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Prime-Minister-Narendra-Modi-3

March 26, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026