MukhyaMantri Ladki Bahin Yojana : राज्यातील आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. वर्षभरापेक्षा अधिक काळ राज्यातील 21 ते 65 वयोगटातील कोट्यावधी महिला या योजनेचा लाभ घेत असून दरमहा 500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र सध्या सणासुदीच्या काळात त्यांना पैशांसाठी वाट पहावी लागत आहे.
ऑगस्ट महीना संपून सप्टेंबर उजाडला, गणरायाचे आगमन होऊन ते परत जाण्याची वेळ आली तरीही लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याचे, ऑगस्टचे पैसे काही अद्याप मिळालेले नाहीत. दरम्यान याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून असे 3 हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, हे हप्ते एकत्र देणार की, दोन वेगवेगळ्या तारखांना दिले जाणार याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
तसेच या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाहीये. पण हे पैसे मिळणार कधी याकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या स्क्रूटिनी बद्दल मंत्री अदिती तटकरे यांनी भाष्य केलं आहे.आमच्याकडे लाडक्या बहिणी साठी हे रजिस्ट्रेशन होत, ते 2 कोटी 63 लाखांपेक्षा जास्त होतं. सगळ्या विभागाकडून आम्ही डेटा मागवला होता
नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहिण अस एकत्र करून त्यांना 1500 रुपये दिले. त्यात नमो शेतकरी योजनेचे 1000 लाख रुपये आहेत. स्क्रूटिनी केल्याने तो आकडा 2 कोटी 48 लाखांवर आला, ती केली नसती तर हा आकडा कमी झाला नसता असे त्या म्हणाल्या .
अनेकांनी योजनेच्या पैशांवर मारला डल्ला
यापूर्वी अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले होते. तब्बल 2 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले होते. सरकारी नोकरीतून पैसा, वेतन आयागोचे फायदे असतानाही अनेक महिलांनी लाडकी बहीणसाठी अर्ज केला. तर दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा 14 हजारांपेक्षा जास्तच पुरूषांनी या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लाटल्याचेही उघड झाले होते. दरम्यान लाडक्या बहिणींच्या पैशांचा लाभ लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून राज्य सरकारकडून कारवाईचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.