पत्रकाराला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; पेपर विक्रेत्यावर गुन्हा दाखल

By: Editor_Manas

On: Saturday, September 20, 2025 1:28 PM

Google News
Follow Us

पुणे : अतिक्रमणावरील बातमी प्रसिद्ध केल्याने एका पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित पेपर विक्रेत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पत्रकार अमोल सहारे हे पुण्यातील एका नामांकित दैनिकात कार्यरत आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ मीनाक्षी लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईची बातमी सहारे यांनी प्रकाशित केली.

दरम्यान, नितीन शिंदे (रा. दर्गा वसाहत, खडकी) या पेपर विक्रेत्याने संबंधित बातमीच्या विरोधात दैनिकाच्या कार्यालयात फोन करून सहारे यांच्यावर अश्लील भाषेत टीका केली. इतकेच नाही तर, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकत माफी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर कॉन्फरन्स कॉलदरम्यान शिंदे यांनी पत्रकार सहारे यांना अश्लील शिवीगाळ करत “हातपाय तोडून जीवे मारण्याची” थेट धमकी दिली. या संपूर्ण संभाषणाचे रेकॉर्डिंग पत्रकार सहारे यांच्या मोबाईलमध्ये झाले आहे.

पत्रकाराला धमकी मिळाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. त्यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नितीन शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Prime-Minister-Narendra-Modi-3

March 26, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026