गणपती मंडळांसाठी महत्वाचा नियम;  उद्या (५ सप्टेंबर) रात्री १० नंतर ध्वनीवर्धक बंद ठेवणे बंधनकारक

पुणे : राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर, मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी व उत्साह लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनीवर्धकांच्या वापराबाबत नवे आदेश जाहीर केले आहेत.

📌 जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी काढलेल्या सुधारित आदेशानुसार:

  • वर्षभरात केवळ १५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धकांना परवानगी दिली जाणार.

  • यामध्ये शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी, नवरात्र नवमी, दसरा, ख्रिसमस व ३१ डिसेंबर आदी प्रमुख दिवसांचा समावेश आहे.

गणेशोत्सव २०२५ मध्ये परवानगी असलेले दिवस 🎶

गणपतीत फक्त ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत आवाजाची मुभा देण्यात आली आहे:

  • ३० ऑगस्ट (चौथा दिवस)

  • ३१ ऑगस्ट (पाचवा दिवस)

  • १ सप्टेंबर (सहावा दिवस)

  • २ सप्टेंबर (सातवा दिवस)

  • ३ सप्टेंबर (आठवा दिवस)

  • ४ सप्टेंबर (नववा दिवस)

  • ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी – अकरावा दिवस)

❌ मात्र, ५ सप्टेंबर (दहावा दिवस) यामध्ये समाविष्ट नाही.

➡️ त्यामुळे उद्या शुक्रवारी (ता. ५) रात्री १० नंतर ध्वनीवर्धक वाजविण्यास सक्त मनाई असेल.

अटी 📑

  1. ध्वनी प्रदूषण नियम 2000 व 2017 नुसार मर्यादांचे पालन करणे बंधनकारक.

  2. झोननुसार निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज नको.

  3. ही सूट शांतता क्षेत्रात लागू नाही, त्याची अंमलबजावणी स्थानिक प्रशासन करेल.