Horoscope Today 26th September 2025
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित दैनंदिन राशिभविष्य नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ गोष्टींचे संकेत देते.
मेष
कामाच्या ठिकाणी अनोळखी लोकांशी वाद टाळा. सामाजिक आणि राजकीय कार्यात तुमची आघाडी राहील, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
वृषभ
विद्यार्थ्यांसाठी यशाचा दिवस. स्पर्धा परीक्षेत आनंदाची बातमी येईल. आर्थिक स्थैर्य टिकेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण लाभतील.
मिथुन
वादग्रस्त बाबींना दूर ठेवा. बांधकामातील अडथळे दूर होतील. नवीन ओळखी होतील. राजकारणात जनतेकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक समस्या सुटतील.
कर्क
दिवस चांगला जाईल. ऑफिसमध्ये कामाला वेळ लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे. जुन्या समस्येतून आराम मिळेल.
सिंह
सकाळी शुभवार्ता मिळेल. कामात उत्साह वाढेल. जबाबदारीची नवीन संधी मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.
कन्या
व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. नोकरी बदलताना काळजी घ्या. संध्याकाळी चांगली बातमी मिळेल. प्रिय व्यक्तीशी नाते अधिक गोड होईल.
तूळ
सर्व कामे वेळेत पूर्ण करा, यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना संधी मिळेल. कुटुंब-मित्रांकडून व्यवसायात साथ मिळेल.
वृश्चिक
आजचा दिवस अनुकूल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. सर्जनशील प्रयत्नांना मान्यता मिळेल.
धनु
आरोग्याकडे लक्ष द्या, तणाव टाळा. मित्रांचा आधार मिळेल. मालमत्तेच्या बाबतीत काळजी घ्या. पालकांच्या आरोग्याची चिंता वाढेल.
मकर
कुटुंबात आनंदाचे वातावरण. मात्र ऑफिसमधील कामाचा ताण असल्याने जोडीदारासोबतचे नियोजन रद्द होऊ शकते. निर्णय घेणे थोडे अवघड जाईल.
कुंभ
कामाच्या वातावरणात बदल दिसेल. आत्मविश्वास ठेवा. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. मित्रांशी मतभेद संभवतात. आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्या.
मीन
आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी दिवस उत्तम.