GST Slab Change : दिवाळीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय! आता फक्त दोनच स्लॅब; दूध-पनीर, साबण, टीव्ही आणि सिमेंट स्वस्त
नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जीएसटी कौन्सिलच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मोठा निर्णय घेत 12% आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आला असून, आता देशात केवळ 5% आणि 18% असे दोनच जीएसटी स्लॅब लागू राहतील. सरकारचा हा नवा कर आराखडा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनीच जीएसटी सुधारणा होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता जीएसटी कौन्सिलने निर्णय जाहीर केला आहे.
✅ नवीन जीएसटी रचना
-
28% करमुक्त – आता 18% लागू.
-
12% करमुक्त – आता फक्त 5% लागू.
-
काही आवश्यक वस्तूंवर 0% कर.
कोणत्या वस्तूंवर दिलासा मिळणार?
🍞 खाद्यपदार्थ (Food Items)
-
रोटी, पनीर, प्रोसेस्ड दूध यांवरील कर पूर्णपणे रद्द.
-
दैनंदिन खाद्यपदार्थांवर फक्त 5% कर.
🌾 कृषी उत्पादने (Agri Goods)
-
शेतकऱ्यांच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी 12% वरून 5% वर.
🏠 घर आणि बांधकाम साहित्य (Housing & Cement)
-
सिमेंटवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी.
-
मध्यमवर्गीय घरखरेदीदारांना दिलासा.
💊 औषधे (Medicines)
-
कॅन्सर आणि रेअर ड्रग्सवरील करात कपात.
🚗 वाहन क्षेत्र (Automobile Sector)
-
बस, ट्रक, ॲम्ब्युलन्स, थ्री-व्हीलर, ऑटो पार्ट्स यांवर आता फक्त 18% कर.
-
संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योगाला दिलासा.
🧼 दैनंदिन वस्तू (Daily Use Items)
-
साबण, टूथपेस्ट, शॅम्पू यांवरील करात मोठी घट; 18% वरून 5% किंवा 0% पर्यंत.
🛡️ विमा (Insurance)
-
हेल्थ, लाइफ आणि रिइन्शुरन्स पॉलिसींवरील कर पूर्णपणे रद्द.
-
टर्म लाइफ, ULIP, एंडोमेंट, फ्लोटर पॉलिसी व ज्येष्ठांसाठीच्या पॉलिसींना करमुक्ती.
🚬 विशेष 40% श्रेणी (Special 40% Slab)
-
पान मसाला, तंबाखू आणि अल्ट्रा-लक्झरी वस्तूंवर वेगळा 40% कर लागू.