इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या पुण्यातील पहिल्या फेरीची घोषणा करणाऱ्या पोस्टरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनावरण केले

  • पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील प्रतिष्ठित श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात 25 आणि 26 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यक्रमाचे आयोजन.
  • महाराष्ट्राच्या क्रीडा दृष्टिकोनाला प्रोत्साहन : क्रीडा क्षेत्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्ट स्पर्धा आयोजित करण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेला हा कार्यक्रम बळकटी देतो.
  • भारतातील सर्वात मोठा 360° मोटरस्पोर्ट महोत्सव रीझ मोटो फॅनपार्कचे अनावरण
  • जागतिक सुपरक्रॉस शोडाऊन: 6 संघ, 6 शर्यती, 36 आंतरराष्ट्रीय रायडर्स.

जागतिक मोटरस्पोर्टिंग नकाशावर भारताला मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सातत्याने प्रयत्नशील आहे. भारताच्या क्रीडा आकांक्षांना प्रोत्साहन देण्यासाठी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी पुण्यात इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सीझन 2 मधील पहिल्या राउंडच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण केले. जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, भारतीय खेळाडूंना योग्य ते प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी सक्षम परिसंस्था तयार करण्याच्या दृष्टीने सरकारची वचनबद्धता दर्शवते.

ISRL ची बहुप्रतिक्षित उद्घाटन फेरी 26 ऑक्टोबर 2025 रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरू होईल. ही स्पर्धा नंतर जागतिक दर्जाच्या सुपरक्रॉस ट्रॅकमध्ये रूपांतरित होईल. 15,000 हून अधिक चाहते या उद्घाटन सोहोळ्याला उपस्थित राहतील असा आयोजकांचा अंदाज आहे.

ब्लॉकबस्टर सीझन 1 ज्या ठिकाणी झाला, तिथेच पुन्हा या स्पर्धा होणार आहेत. पहिल्या फेरीत 6 संघ, 6 शर्यती आणि 36 अव्वल आंतरराष्ट्रीय रायडर्स भारतातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत स्पर्धा करतील. ज्यामुळे इंडियन सुपरक्रॉसचे माहेरघर म्हणून पुण्याची स्थान अधिक दृढ होईल.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले: “खेळांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे पुण्यात इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे आयोजन होणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे केंद्र म्हणून आपल्या शहराचे स्थान अधिक बळकट तर होतेच पण जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबतच आपली प्रतिभा दाखवण्यासाठी स्थानिक खेळाडूंना एक मंच उपलब्ध होतो. ISRL सारखे उपक्रम तरुणांना एका ध्येयाने खेळण्यास प्रेरित करतातच पण जागतिक क्रीडा केंद्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात महाराष्ट्राचे स्थान अधिक भक्कम करतात.”

 इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे सह-संस्थापक ईशान लोखंडे म्हणतात: “आमच्या खेळाडूंना जागतिक स्तरावरील अनुभव देऊन तसेच चाहत्यांना जगातील सर्वोत्तम अनुभव देऊन भारतातील सुपरक्रॉस वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. पुणे हा इंडियन सुपरक्रॉसचे हृदय आणि आत्मा आहे. त्यामुळेच आमच्या आणखी एका साहसी हंगामासाठी ते एक आदर्श लाँचपॅड आहे.

रीज मोटो फॅनपार्क – भारतातील सर्वात मोठा 360° मोटरस्पोर्ट अनुभव

26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणारा, रीझ मोटो फॅनपार्क हा अनेक अनोख्या गोष्टींचा साक्षीदार असेल. परस्परसंवादी सहभाग, गेमिंग झोन, ब्रँड सक्रियकरण, खास गोष्टी आणि रायडर्सची भेट अशा अनेक गोष्टी त्यात असतील. ज्यामुळे केवळ रेसट्रॅकवरच नाही तर सर्वत्र उत्सवाचे वातावरण तयार करेल.

मुख्य शर्यती दुपारी 3 ते 5:30 पर्यंत चालतील. याची तिकिटे लवकरच तुम्हाला BookMyShow वर उपलब्ध होतील. यात प्रीमियम हॉस्पिटॅलिटी बॉक्स आणि व्हीआयपी जागांचा देखील समावेश आहे. यामुळे शर्यतीचा अनुभव अविस्मरणीय होईल.

सीझन 2 चे वेळापत्रक

  • पुणे26 ऑक्टोबर 2025
  • हैदराबाद7 डिसेंबर 2025
  • अंतिम फेरी21 डिसेंबर 2025 

चाहते थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन याचा आनंद लुटू शकतात किंवा आघाडीच्या ब्रॉडकास्टर चॅनेल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्यून इन करू शकतात. ISRL सीझन 2 चे जागतिक स्तरावर देखील प्रसारण केले जाईल, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉलो केल्या जाणाऱ्या #FlirtWithDirt मोहिमेद्वारे भारतातील मोटरस्पोर्ट उत्सवाचे प्रदर्शन होईल.