ZEISS इंडिया व मित्तल ऑप्टिक्स यांच्या सहयोगाने पुणे, महाराष्ट्रात ZEISS VISION CENTER चे उद्घाटन

ज़ाइस विज़न सेंटर तज्ज्ञांकडून वैयक्तिक सल्लामसलत, प्रीमियम फ्रेम्सची विस्तृत निवड आणि प्रगत ZEISS तंत्रज्ञानावर आधारित सर्वोत्तम दर्जाचे लेन्सेस उपलब्ध करून देते

पुणे, 20 ऑगस्ट 2025: 178+ वर्षांच्या समृद्ध वारशासह ऑप्टिक्स व ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जागतिक अग्रणी ज़ाइस ने मित्तल ऑप्टिक्सच्या सहयोगाने पुण्यात ज़ाइस विज़न सेंटर चे उद्घाटन केले. यामहत्त्वपूर्ण उद्घाटनाद्वारे ज़ाइस इंडिया पुणेकरांसाठी अत्याधुनिक व प्रीमियमडोळ्यांच्या आरोग्याची (eye-care) उपाययोजना आणण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.

बाणेर येथील Solitaire Business Hub मध्ये पसरलेल्या 1300 चौरस फूटाच्या या केंद्रामध्ये ग्राहकांना अत्याधुनिक नेत्रसंपदा (eyewear) अनुभव मिळणार आहे. ज़ाइस विज़न सेंटर मध्ये प्रीमियम फ्रेम्सची निवड असून, ZEISS VISUFIT 1000 च्या मदतीने अचूक 3D डिजिटल सेंट्रेशन व ZEISS VISUCORE 500 द्वारे जलद व अचूक रिफ्रॅक्शन केले जाईल. यामुळे तज्ज्ञ टीमला प्रत्येक ग्राहकाच्या आवश्यकतांनुसार वैयक्तिक लेन्स सोल्युशन्स तयार करता येतात.

उद्घाटनप्रसंगी मित्तल ऑप्टिक्सचे मालक श्री. निलेश मित्तल म्हणाले, “ज़ाइस इंडिया सोबत भागीदारी करणे हे पुण्यात उच्च दर्जाची नेत्रसेवा (eye care) देण्याच्या आमच्या ध्येयाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ज़ाइसचे प्रगत तंत्रज्ञान आणि आमचे कौशल्य यांचा संगम करून आम्ही एक असे ठिकाण निर्माण केले आहे जे प्रीमियम नेत्रसंपदा उपाय व प्रत्येक ग्राहकासाठी वैयक्तिक अनुभव देते.

1967 पासूनचा आमचा वारसा व जगातील प्रतिष्ठित नेत्रसंपदा ब्रँड्सचे खास पोर्टफोलिओ यामुळे आम्हाला पुण्यात जागतिक दर्जाचा अनुभव देण्याचा अभिमान आहे. वाढत्या दर्जेदार नेत्रसंपदा व प्रगत निदान सेवांच्या मागणीमुळे या विकसित होणाऱ्या बाजारपेठेत मोठी संधी आम्हाला दिसत आहे.”

ज़ाइस इंडिया – व्हिजन केअर विभाग, भारत व शेजारील बाजारपेठांचे बिझनेस हेड श्री. रोहन पॉल म्हणाले, “पुण्यात ज़ाइस विज़न सेंटर सुरू करणे हे एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे ज़ाइस च्या प्रगत ऑप्टिकल तंत्रज्ञानाचे व मित्तल ऑप्टिक्सच्या स्थानिक अनुभव व ग्राहक समजुतीचे अद्वितीय मिश्रण आहे. पुणेकरांना उत्कृष्ट दृष्टी व वैयक्तिक शैली देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि डोळ्यांच्या आरोग्याचा एक नवा मापदंड ठरवू इच्छितो.”

ज़ाइस विज़न सेंटर मध्ये विविध ज़ाइस लेन्सेसची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल, ज्यामध्ये नवीनतम इनोव्हेशन्स – ZEISS DuraVision Gold UV लेन्सेस (अत्युत्कृष्ट टिकाऊपणा व UV संरक्षणासाठी), ZEISS MyoCare लेन्सेस (मायोपिया असलेल्या मुलांसाठी खास तयार), तसेचZEISS SmartLife Lenses (आधुनिक, डिजिटल जीवनशैलीसाठी डिझाईन केलेले) यांचा समावेश आहे. याशिवाय, सन लेंस कॅटेगरीमध्ये विविध टिंट्स व पॉलारायझेशनसह वैयक्तिक पर्याय देखील उपलब्ध असतील, तसेच सर्व वयोगटांसाठी प्रीमियम फ्रेम्सची विशेष निवडही पाहायला मिळेल.

ग्राहकांना सर्वाधिक आरामदायी व वैयक्तिक अनुभव देण्यासाठी, ज़ाइस विज़न सेंटर मधील प्रमाणित ऑप्टोमेट्रिस्ट्स प्रगत निदान साधनांचा वापर करून सखोल नेत्रपरीक्षण करतील.