Pune News : येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात गुरुवारी (२१ ऑगस्ट) संध्याकाळी अचानक “मानवी सांगाडा” दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. भर रस्त्यावर सांगाडा पडलेला पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि लगेचच धावपळ उडाली.
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील या चौकात सांगाडा रस्त्याच्या मध्यभागी पडलेला होता. मोठ्या रहदारीमुळे काही चारचाकी वाहनं त्याच्यावरून गेली. सांगाडा डोके, धड आणि कमरेपर्यंत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सांगाडा ताब्यात घेतला. मात्र तपासाअंती समोर आलेली गोष्ट वेगळीच निघाली – तो खरा सांगाडा नसून प्लास्टर ऑफ पॅरिस आणि तारेचा वापर करून बनवलेला बनावट सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी दिलासा घेतला.