Pune Corporation Election : मनपा निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर

Pune Corporation Election : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबत माहिती दिली.

नवीन रचनेनुसार मनपा क्षेत्रात एकूण ४१ प्रभाग असतील. यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय तर प्रभाग क्र. ३८ हा पाच सदस्यीय असेल. त्यामुळे निवडून द्यावयाच्या नगरसेवकांची संख्या १६५ इतकी असेल.

२०११ च्या जनगणनेनुसार पुणे महानगरपालिकेची लोकसंख्या ३४,८१,३५९, अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ आहे.

हरकती व सूचना

  • नागरिकांना प्रभाग रचनेबाबत २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना सादर करता येतील.

  • ४ सप्टेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत असेल.

  • लेखी स्वरूपातील हरकती/सूचना पुणे मनपा भवन, सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच स्वा.वि.दा. सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालयात स्वीकारल्या जातील.