Ladki Bahin Yojana : लाडकीच्या खात्यात जुलैचे ₹१५०० जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का? पैसे जमा झाले की नाही असं करा चेक

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील हजारो महिलांसाठी एक सुखद बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या तोंडावर आलेल्या या रकमेमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला आहे. या रकमेची तुलना अनेकांनी रक्षाबंधनाच्या “ओवाळणी”शी करत ही योजना महिलांसाठी किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.

रक्षाबंधनपूर्वीच जमा झाले पैसे

लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आश्वासन दिलं होतं की, रक्षाबंधन दिवशी जुलैचा हप्ता जमा केला जाईल. त्यानंतर योजना विभागाने प्रक्रिया सुरू केली आणि आता खात्यावर १५०० रुपये जमा झाल्याची माहिती अनेक महिलांनी दिली आहे.

पैसे जमा झालेत की नाही, अशी घ्या खात्री

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी आपल्याला रकमेचा हप्ता मिळाला आहे की नाही, हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून तपासू शकतात.

ऑनलाइन पद्धत:

  • बँकेचे अधिकृत अ‍ॅप उघडून ट्रान्झॅक्शन हिस्ट्री किंवा बॅलेन्स चेक करा.

  • तिथे ‘DBT’ किंवा सरकारच्या नावाने आलेली एंट्री पाहून पैसे आलेत की नाही, हे समजेल.

ऑफलाइन पद्धत:

  • जवळच्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री करून घ्या.

  • एटीएममधून बॅलेन्स इन्क्वायरी देखील करू शकता.